
Gold Rate Today | आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सराफा बाजारात आणि एमसीएक्स एक्सचेंजमध्ये सोने घसरणीसह उघडले आहे. तर चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. चांदीचे दरही आज लाल चिन्हावर व्यवहार करताना दिसत आहेत. येत्या काळात दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. मात्र, जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकदा त्यांचे लेटेस्ट रेट नक्की तपासून पाहा.
आज सराफा बाजारातील सोन्याचे नवे दर
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 60602 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी सोने 60698 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्यामुळे आज सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम ९६ रुपयांची घसरण झाली आहे.
आज सोन्याचा भाव उच्चांकी पातळीपेक्षा किती स्वस्त?
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 983 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते.
आज चांदीचा भाव
आज चांदीचा भाव 71530 रुपये प्रति किलो झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 72094 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीच्या दरात प्रति किलो ५६४ रुपयांची घसरण झाली आहे. चांदी ४९३४ रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा नवा भाव किती?
Gold Rate Today Aurangabad
औरंगाबाद, 22 कॅरेट सोने : 56650 रुपये, 24 कॅरेट सोने : 61800 रुपये
Gold Rate Today Mumbai
मुंबई, 22 कॅरेट सोने : 56650 रुपये, 24 कॅरेट सोने : 61800 रुपये
Gold Rate Today Nagpur
नागपूर, २२ कॅरेट सोने : ५६६५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१८०० रुपये
Gold Rate Today Nashik
नाशिक, 22 कॅरेट सोने : 56680, 24 कॅरेट सोने : 61830 रुपये
Gold Rate Today Pune
पुणे, 22 कॅरेट सोने : 56650 रुपये, 24 कॅरेट सोने : 61800 रुपये
Gold Rate Today Thane
ठाणे, 22 कॅरेट सोने : 56650 रुपये, 24 कॅरेट सोने : 61800 रुपये
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.