30 April 2025 5:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Gold Selling Tips | घरामधील जुनं सोनं विकण्याचा विचार करताय? तत्पूर्वी ही बातमी वाचा, कदाचित विचार बदलू शकतो

Gold Selling Tips

Gold Selling Tips | भारतीय बाजारपेठेत सोन्या चांदीच्या वस्तूंना त्याचबरोबर दागिन्यांना प्रचंड महत्व दिले आहे. पूर्वीच्या काळी कोणत्याही प्रकारची आर्थिक संकट ओढावली की, घरामध्ये तयार करून ठेवलेला एखादा डाग मोडून संकट सांभाळून घेतली जायची. पूर्वीच्या महिला सोन्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करून ठेवायच्या. अजूनही अनेक व्यक्तींकडे जुने दागिने आहेत. काही व्यक्ती जुने दागिने मोडून त्यांच्या नवीन डिझाईन किंवा त्या बदल्यात दुसरे कोणतेतरी दागिने बनवून घेतात.

सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे घरामधील असलेले जुने सोने विकून त्या बदल्यात एखादा नवीन दागिना तयार करण्याचा विचार लोक करतात. तुम्ही देखील तुमच्याजवळ असलेले जुने दागिने विकण्यासाठी काढत असाल तर, सावधान. तुम्हाला काही गोष्टींची खास काळजी घ्यावी लागेल. नाहीतर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

जुने सोने विकताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी :
1. जुने सोने विकत असताना सर्वप्रथम हॉलमार्किंग तपासणे अत्यंत गरजेचे आहे. पूर्वीच्या काळी सोन्याच्या दागिन्यांवर किंवा वस्तूंवर हॉलमार्किंग अनिवार्य नव्हते. त्यामुळे बहुतांश जुन्या दागिन्यांवर कोणत्याही प्रकारचा खरं सोने असल्याचे निशाण आढळून येत नाही.

2. तुमचे दागिने देखील जुने असतील आणि त्याच्यावर हॉलमार्किंग नसेल तर, तुमच्या सोन्याच्या शुद्धतेबाबत शंका घेतली जाईल. तुमच्या सोन्यावरील हॉलमार्किंगमुळे सोने खरे आहे की खोटे हे तपासण्यास सोपे जाते. त्याचबरोबर तुम्हाला सोन्याची योग्य किंमत देखील मिळते.

3. 2023 वर्षाच्या 1 एप्रिल या तारखेपासून सरकारने प्रत्येक सोन्याच्या वस्तूवरील किंवा दागिन्यांवरील 6 अंकांचे हॉलमार्किंग युनिक आयडेंटिफिकेशन अनिवार्य केले आहे. हॉलमार्किंग असलेल्या सोन्यामध्ये प्रकारची अशुद्धता काढली जात नाही. त्याचबरोबर 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये खरं सोन 91.66% असते ही गोष्ट कायम लक्षात ठेवा.

4. तुम्ही 18 कॅरेटच सोन खरेदी करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला 75 टक्के सोनं आढळतं. 14 कॅरेटमध्ये 58.3%, 22 कॅरेटमध्ये 916 नंबर, 14 कॅरेटसाठी 585 तर, 18 कॅरेटसाठी 750 नंबर पाहायला मिळतो. त्यामुळे तुम्ही तुमचे सोने विकत असाल तर त्यावर योग्य हॉलमार्किंग आहे की नाही याची नक्की खात्री करून घ्या.

5. अनेकांना असाही प्रश्न पडलेला असतो की, जुन्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करून घेता येते का. तरी याचे उत्तर आहे होय. तुम्ही BIS सेंटरच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमच्या शहरातील हॉलमार्किंग केंद्राचा पत्ता शोधू शकता.

6. केंद्रांमध्ये तुमच्या सोन्याची तपासणी 3 पद्धतीने केली जाते. संपूर्ण तपासणी करून झाल्यानंतर तुमच्या सोन्यावर योग्य हॉलमार्क केले जाते. तुमच्या जुन्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करण्यासाठी प्रत्येक दागिण्याच्या मागे 45 रुपयांचा शुल्क आकारण्यात येतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gold Selling Tips(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या