मुंबई, १७ जून | भारतीय जनता पक्षाचे काही लोक काल शिवसेना भवनासमोर आले होते. त्यांनी तिथे राडा करण्याचा प्रयत्न केला. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सज्जड इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काल राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. त्यावेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय राऊत यांनी हा इशारा दिला आहे. यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रतिउत्तर दिलं आहे.

शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनासमोर जुंपली होती. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता प्रसाद दिलाय, पुढे शिवभोजन थाळी देऊ, असा इशारा भाजपला दिला आहे. त्यावरही राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवप्रसाद देणाऱ्यांनी कधी घराबाहेरही यावं. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा संजय राऊतांची अवस्था काय झाली होती हे सांगायला नको. राऊतांनी शिवभोजनाची भाषा करू नये. मैदानात यावं. राऊत दोन पायांवर जाणार नाहीत हे मी ठामपणे सांगतो, असा इशाराही त्यांनी दिला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: BJP MLA Nitesh Rane warned to Shivsena MP Sanjay Raut after shivsena Bhawans incident news updates.

राऊतांनी शिवभोजनाची भाषा करू नये, मैदानात यावं ते दोन पायांवर जाणार नाहीत – आ. नितेश राणे