15 December 2024 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 7 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
x

आमदार फुटत नव्हते | अनपेक्षितपणे निवडक IPS अधिकाऱ्यांचं बंड समोर आलं | आधीच भविष्यवाण्या?

BJP politics, IPS lobby, Actions, Maharashtra

मुंबई, २४ मार्च: राज्य सरकारशी छुपा वाद झाल्याने तीन अतिवरिष्ठ पोलिस अधिकारी गेल्या अडीच महिन्यात प्रतिनियुक्ती तथा डेप्यूटेशनवर केंद्रात गेले आहेत. त्यात राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, महासंचालक (नागरी संरक्षण दल) रश्मी शुक्ला आणि डीआयजी मनोजकुमार शर्मा यांचा समावेश आहे. तर, त्यांच्यापेक्षा उघड आणि मोठा जाहीर वाद नाही तर संघर्ष परमबीरसिंह यांचा झाला, असल्याने ते ही केंद्रात डेप्यूटेशनवर जाणार का याकडे लक्ष लागले आहे.

मुंबई आयुक्तपदावरून परमबीरसिंह यांची डीजी (गृहरक्षक दल तथा होमगार्ड) बदली करण्यात आली आहे. त्यामुळे ते ही, जर राज्य सरकारशी झालेल्या मतभेदातून केंद्रात गेले, तर तीन महिन्यात राज्यातून केंद्रात जाणारे ते तिसरे नाराज डीजी ठरतील. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे पैसे घेऊन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या करीत असल्याचा आरोप परमबीरसिंह यांनी याचिकेतही केलेला आहे. त्यात करण्यात आलेल्या दाव्यानुसार शुक्ला या राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी २४ व २५ ऑगस्ट २०२० ला देशमुख हे पैसे घेऊन बदल्या करीत असल्याचे राज्याचे तत्कालीन पोलिस महासंचालक जयस्वाल व राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांच्या निदर्शनास आणले होते. त्यावर कारवाई करण्याऐवजी उलट शुक्ला यांचीच बदली डीजी (सिव्हील डिफेन्स) या बिगर महत्वाच्या जागी करण्यात आली. या सर्व अधिकाऱ्यांचे आरोप पहिले तर यांना स्वतःला हव्या आहेत प्रमाणे बदल्या केल्या तरच सरकार प्रामाणिक असं वाटत असावं. हा झाला वादाचा विषय.

राजकारणात एखाद्या नाराज पदाधिकाऱ्याने पक्ष सोडायचा ठरवूनच ठेवलं असेल तर त्याच्यासाठी काही केलं तरी तो पक्ष आणि पक्ष नैतृत्वावर टीका करून बाहेर पडतो. कारण त्यांनी त्यांचे निर्णय आधीच ठरवून ठेवलेले असतात आणि त्याप्रमाणेच नाराजी नंतर डेप्यूटेशनवर केंद्रात आणि त्यानंतर थेट स्वतःकडे असलेल्या महत्वाच्या गोष्टी विरोधकांना देऊन भविष्यात फायदा करून घेणं असा असावा. अगदी भाजपच्या सांगण्यावर तर सर्व होणार नव्हतं ना अशी शंका विरोधकांच्या मनात देखील घर करून असावी. पण भाजपच्या बाबतीत कोणतीही गोष्ट नैसर्गिक नसते असा इतिहास सांगतो. त्याचं बीज रोवलं गेलं होतं ते चंद्रकांत पाटील यांच्या त्या ट्विटमध्ये ज्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही सुगावा लागला नव्हता. वास्तविक सत्ताधाऱ्यांचे आमदार फुटणं अशक्य दिसू लागल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत सापळा रचला गेला अशा थेट आरोप देखील होऊ लागला आहे. एका अधिकाऱ्याची नेमणूक कुठे होऊ शकते याची देखील भविष्यवाणी केली होती.

७ नोव्हेंबर २०२० मध्ये चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचं ट्विट केलं होतं. ज्याचा अर्थ अनेकांना आता आला असावा. त्या ट्विट मध्ये चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की, “आता काही वेळापूर्वीच एक धक्कादायक आणि दुःखद बातमी वाचली. राज्याचे सर्वोच्च पोलीस अधिकारी आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री. सुबोध कुमार जयस्वाल जी हे आपल्या पदावरून पायउतार होऊन केंद्रीय सेवेत जाणार आहेत…येणाऱ्या काळात देशाच्या पराक्रमी अशा राष्ट्रीय सुरक्षा बल (एनएसजी) च्या सर्वोच्च पदी विराजमान होणार आहेत अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे….राज्यातील गेल्या काही महिन्यांमधील घटनांमुळे श्री. जैस्वाल यांच्यासारख्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या भावनांना धक्का पोहोचला आहे….या महाभकास आघाडीच्या सरकारने सर्व धोरणांना बाजूला सारून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. भारताची गुप्तचर संघटना ‘रॉ’मध्ये काम केल्यानंतर सर्वप्रथम 2018 साली श्री. जयस्वाल यांनी मुंबई पोलीस आयुक्ताचा पदभार सांभाळला.

 

 

News English Summary: In the last two and a half months, three senior police officers have gone to the Center on deputation and deputation due to a secret dispute with the state government. They include State Director General of Police Subodh Kumar Jaiswal, Director General (Civil Defense Force) Rashmi Shukla and DIG Manoj Kumar Sharma. So, there is no more open and big public debate than him, but the struggle was with Parambir Singh, so it is being looked at whether he will go on deputation to the Center.

News English Title: BJP politics over IPS lobby actions in Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x