मुंबई : काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करणाऱ्या आणि उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उमेदवार म्हणून उतरलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

उर्मिला मार्तोंडकर हिने एका टीव्ही शोमध्ये बोलताना हिंदू हा सगळ्यात जास्त हिंसाचार करणारा धर्म असल्याचे म्हटले होते. तिच्या या वक्तव्याने हिंदूंच्या भावना दुखावल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुरेश नाखवा यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मागील २ दिवसांपूर्वा इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला उर्मिला मार्तोंडकर हिने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत दरम्यान तिने हिंदू धर्म हा जगातील सर्वात जास्त हिंसाचार घडवणार धर्म असल्याचे म्हटले

दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी केलेव्या वक्तव्यामुळे माझ्यासारख्या अनेक हिंदूच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी ही सर्व वक्तव्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून केली आहेत. त्यामुळे उर्मिला मातोंडकर, राहुल गांधी आणि राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली, असे नाखवा यांनी म्हटले.

उत्तर मुंबई उमेदवार उर्मिला मातोंडकर विरोधात भाजपाची पोलिसात तक्रार