पुणे: राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेकडून वेगवान हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस शिवसेनेसोबत जाणार की नाही, यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचा दावा पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांंनी सांगितले. काॅंग्रेसने ठरविल्याशिवाय राष्ट्रवादी आपला निर्णय घेणार नसल्याचेही राष्ट्रवादीने सांगितले आहे. तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाला बहुमत असूनही सत्तास्थापन करता आली नाही. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी दिलेली मुदत संपतानाच भारतीय जनता पक्षाने पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट सांगितले की, आम्ही सरकार स्थापन करणार नाही. या निर्णयाचा भारतीय जनता पक्ष नेत्यांनी स्विकार केला.

भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेसाठी शनिवारी रात्री राज्यपालांनी आमंत्रण दिल्यानंतर रविवारी भारतीय जनता पक्षाने शिवसेना सोबत नसल्याने सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याचे स्पष्ट केलं. यासंदर्भातील ट्विट महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आले हेच. ट्विट कोट करत चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “सत्तेपेक्षा तत्व महत्वाचे… अभिमानास्पद निर्णय!,” असं ट्विट वाघ यांनी केलं होतं.

भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेवर चित्रा वाघ म्हणाल्या की, भाजपने घेतलेला निर्णय अभिमानास्पद आहे. सत्तेपेक्षा तत्व महत्त्वाचे असंही वाघ म्हणाल्या. चित्रा वाघ यांच्या या ट्विटला नेटीझन्सने चांगलंच ट्रोल केलंय. वाघ, यांच्या ट्विटवर उलट प्रतिक्रिया देताना, तुम्हाला तत्व आणि निष्ठा ही भाषा शोभत नसल्याचे म्हटले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही चित्रा वाघ यांना टोला लगावला. “ज्या पक्षाने मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा दिली, तो पक्ष सोडताना काहींना तत्व आठवली नाही, जी आता आठवायला लागली आहेत,” असा सवाल चाकणकर यांनी नाव न घेता वाघ यांना विचारला आहे.

‘सत्तेपेक्षा तत्व महत्वाचे’ असं तत्वज्ञान देणाऱ्या चित्रा वाघ यांना राष्ट्रवादी व नेटिझन्सनी झाडलं