27 April 2024 8:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाही; शिवसेनेची टीका

Saamana Newspaper, Shivsena, BJP

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत, असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचा खरा चेहरा कोणता यावर महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने संशोधन सुरू केले आहे. संशोधन म्हणण्यापेक्षा पुरातत्व विभागाचे उत्खनन म्हणणे सोयीचे ठरेल, असं म्हणत शिवसेनेनं भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. २०१४ मध्ये सत्तास्थापनेसाठी शिवसेनेने काँग्रेसशी संपर्क साधला होता, असा दावा काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर निशाणा साधला होता.

२०१४ मध्ये एनसीपी’ने भारतीय जनता पक्षाला उघड पाठिंबा दिला व त्यामागे गुरूमहाराजांची इच्छा व दिशा होती. हे सत्य स्वीकारले तर शिवसेनेच्या चेहऱ्यावर ओरखडे मारण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहणे गरजेचे आहे. २०१४ सालचीच शिवसेना आजही आहे. भारतीय जनता पक्षाला १०५ असूनही विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली. कारण भारतीय जनता पक्षाच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत. बोलायचे एक व करायचे दुसरेच. हे २०१९ सालीही झाले. त्याचे दृश्य फळ म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. सोनिया गांधी यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव फेटाळला नाही असा टोला शिवसेनेने सामना अग्रलेखातून लागण्यात आला आहे.

‘लॉजिक’ म्हणाल तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने आजच्याप्रमाणे एकत्र यावे असे जबरदस्तीने ठरवले असते तरी ‘आकडा’ जमत नव्हता. मारून मुटकून 149 चा आकडा होता व तो धोकादायक होता. ते काठावरचे बहुमत होते व घोडेबाजारात मशहूर असलेले भारतीय जनता पक्षावाले साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करून तोडफोड करायला तयार होते. श्री. फडणवीस यांनी आणखी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. २०१४ साली राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षाला उघड पाठिंबा दिला व त्यामागे गुरूमहाराजांची इच्छा व दिशा होती. हे सत्य स्वीकारले तर शिवसेनेच्या चेहऱ्यावर ओरखडे मारण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहणे गरजेचे आह असं सामनामध्ये म्हटलं आहे.

 

Web Title:  Shivsena criticized BJP Party through Saamana Newspaper.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x