15 December 2024 7:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

मृतदेहाचे फक्त दहन करण्याचा मुंबई महापालिकेचा आदेश तासाभरात मागे; नियमावली लागू

Covid 19 Patients, Corona Crisis. BMC Commissioner

मुंबई, ३० मार्च: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यविधी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून खास प्रोटोकॉल पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाग्रस्त मृत व्यक्ती कोणत्याही धर्माचा असला तरी त्याच्या मृतदेहाचे दहनच करण्यात यावे, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. मुंबईमध्ये सोमवारी आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ८ वर पोहचला आहे.

महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ‘कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह दफन करण्यास परवानगी दिली जाणार नाही. रुग्ण कोणत्याही धर्माचा असला तरी सुद्धा त्याचा मृतदेह दहन करण्यात यावा, असे त्यांनी म्हटले आहे. अंत्यसंस्कारा दरम्यान ५ पेक्षा जास्त लोकांना सहभागी होता येणार नाही. तसंच, जर एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकाने मृतदेहाला दफन करण्याचा आग्रह केला तर मुंबई शहराच्या हद्दीबाहेर मृतदेह दफन करण्यास त्यांना परवानगी दिली जाईल, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

मात्र या आदेशानंतर पालिकेवर प्रश्नांची सरबत्ती होऊ लागल्याने अवघ्या तासाभरातच हे परिपत्रक पालिकेला मागे घ्यावे लागले. दरम्यान, पालिकेने आता सुधारित परिपत्रक जारी केले असून मोठ्या जागेतील कब्रस्तानात अशा व्यक्तीला दफन करता येईल, असा बदल केला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी तातडीने पालिका आयुक्तांशी चर्चा केली व या परिपत्रकाबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. या चर्चेनंतर पालिका आयुक्तांनी तातडीने हे परिपत्रक मागे घेतले आहे. याबाबत नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.

मात्र दफनभूमी मोठी असेल तर पूर्ण काळजी घेत दफन करायला हरकत नाही असं देखील म्हटलं आहे. फक्त मार्गदर्शक तत्त्वानुसार अंत्यविधी करण्यात यावेत असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे दफनाला बंदी या बातमीबद्दल संभ्रम निर्माण झाला. मुंंबईतल्या बहुतेक दफनविधीच्या जागा लोकवस्तीच्या नजिक आहेत, गावाबाहेर नाहीत. त्यामुळे संसर्गाचा धोका टाळण्यासाठी हे उपाय योजले आहेत, असं मुंबई महापालिकेचं म्हणणं होतं.

 

मृत व्यक्तीपासूनही संसर्गाचा धोका असल्याने अंत्यसंस्काराबाबत हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतांनुसार हे आदेश देण्यात आले आहेत. खरंच मृतदेहामुळे कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका आहे का? याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते आम्ही जाणून घेतलं. दफनविधी करताना संसर्गाचा धोका अधिक असतो. मृतदेहाचं दहन करावं, असे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO)संकेत आहेत, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

 

News English Summary: The Mumbai Municipal Corporation has called for a special protocol for the funeral of the deceased. Mumbai Municipal Commissioner Pravin Pardeshi has ordered that the deceased coroner, irrespective of religion, should be cremated. The municipal commissioner has taken this decision in view of the increasing prevalence of the corona virus. ANI news agency reported the incident. Another coroner-infected patient has died in Mumbai on Monday. Therefore, the number of coronaries in Mumbai has reached 8. According to an order issued by Municipal Commissioner Pravin Pardeshi, the body of the coroner will not be allowed to be buried. He said that the dead body should be cremated even if the patient was of any religion. No more than 5 people could attend during the funeral. Also, if a relative of a patient insists on burying the body, they will be allowed to bury the body outside the city limits of Mumbai, the commissioner said.

 

News English Title: Story BMC Commissioner says all bodies of Covid 19 patients should be cremated irrespective of religion Corona Crisis News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x