दिल्लीत लष्कराला पाचारण; पण 'हे आमचे लष्कर नाही'; अग्रलेखातून प्रश्न

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) वरून राजधानी दिल्लीत सलग तीन दिवस उफाळलेल्या हिंसाचाराने तब्बल १३ जणांचा जीव घेतला. तर शंभरपेक्षा अधिकजण जखमी झाले. अद्यापही परिस्थिती म्हणावी तशी नियंत्रणात आलेली नाही. एकीकडे अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर आलेले असताना,दुसरीकडे दिल्लीत हा हिंचाराचा उद्रेक झालेला होता.
सीएए, एनआरसीच्या मुद्द्यावरून दिल्लीत हिंसाचार उफाळला आहे. नव्या कायद्याचे विरोधक व समर्थक आमनेसामने आले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर व विशेषत: दिल्लीत असतानाच हे सगळं घडत आहे. त्याबद्दल शिवसेनेनं चिंता व्यक्त केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून अप्रत्यक्षरित्या भाजपला सुनावण्यात आलं आहे. दिल्लीतील सध्याच्या दंगलीस जबाबदार कोण? हे स्पष्ट होणे गरजेचे आहे,’ अशी मागणी करण्यात आली आहे.
दिल्लीत लष्कराला पाचारण केल्याचे वृत्त आले व लष्करी वेशातील लोक दंगलग्रस्त भागात तैनात असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. लष्करी पोशाखातील शेकडो जवानांचे संचलन जाफराबाद परिसरात झाले, पण “हे आमचे लष्कर नाही’’ असा खुलासा लष्कराच्या अधिकृत प्रवक्त्याने केला. मग दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण? असा सवाल शिवसेनेने सामना अग्रलेखातून विचारला आहे.
तसेच याआधी ‘बुरखा’ वगैरे घालून भाजपची एक कार्यकर्ती शाहीनबाग आंदोलकांच्या गर्दीत घुसली होती. त्यामुळे नक्की कोण कोणाच्या पोशाखात व मुखवटय़ात फिरत आहेत ते समजायला मार्ग नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे दिल्लीतील स्वागत दंगलीच्या आगडोंबाने अशा भयपटाने व्हावे हे बरे नाही. अहमदाबादमध्ये ‘नमस्ते’ आणि दिल्लीत आगडोंब! दिल्लीची इतकी बदनामी याआधी कधीच झाली नव्हती असा टोलाही शिवसेनेला भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.
News English Summery: News has been called of the army in Delhi and photographs of people in military outfits deployed in riot areas have been released. Hundreds of military personnel were stationed in the Jaffarabad area, but an official spokesman said, “This is not our army.” So who are these people in military costumes deployed in riot areas? This question has been asked by the Shiv Sena in the match.
Web Title: Story North East Delhi violence who are these people military outfits deployed riot areas Shivsena asked question through Saamana Newspaper.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Amazon Great Freedom Festival 2022 | अॅमेझॉनने ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये अनेक स्मार्टफोन, गॅझेट्स अत्यंत स्वस्त
-
Notice Period Rule | तुम्ही नोटीस पिरियडची सेवा पूर्ण केल्याशिवाय नोकरी सोडू शकता का?, नियम काय आहेत जाणून घ्या
-
Viral Video | ती 'जरा जरा किस मी किस मी' गाण्यावर डान्स रिल्स रेकॉर्ड करत होती, ते पाहून कुत्रा जवळ आला अन असं झालं पहा
-
Viral Video | व्हिडिओ शूटसाठी जीवाशी खेळ, लग्नात नवरा-नवरीने स्वत:ला घेतले पेटवून, हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
-
Viral Video | मुलांच्या गटाचे राडे पाहिले असतील, पण शाळकरी मुलींमधील तुफान राड्याचा हा व्हायरल व्हिडिओ पाहिला आहे का?
-
SSBA Innovations IPO | टॅक्सबडी पोर्टल चालवणारी कंपनी आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या
-
Twitter Report | पत्रकार, मीडिया संस्थांच्या ट्विटवर सरकारची बारीक नजर?, जगात असे ट्विट हटवण्यात भारत आघाडीवर - रिपोर्ट
-
Multibagger Stocks | असा धमाकेदार शेअर निवडा, फक्त 50 रुपयाचा स्टॉक, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 2 कोटी रुपये केले
-
iQOO 9T 5G Smartphone | आयक्यूओओ 9T 5G स्मार्टफोन लाँच, किंमत आणि डिटेल्स पाहा
-
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठी जनता आणि मराठी पत्रकार देखील संताप व्यक्त करताना एकवटले