26 July 2021 12:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये

Tauktae cyclon

मुंबई, १७ मे | तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात बसल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील हिंदमाता आणि अन्य सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. तर अनेक भागात झाडे उन्मळून पडली आहेत. अशावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये पोहोचले. तिथून त्यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतलाय. त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्वाच्या सूचनाही केल्या आहेत. वादळाची तीव्रता संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना देखील आवाहन केलंय. तसेच, “मी पुन्हा एकादा नागरिकांना सांगतो की, कोविड आहे तर घरातच रहा. जे अति महत्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडले आहेत, त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. सध्याचे जे वारे आपण पाहतो आहोत, मुंबईत कधीच न झालेले असे हे वारे आहेत. कुठंही जीवीतहानी होणार नाही याची आपण दक्षता घेत आहोत.” अशी देखील माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.

 

News English Summary: The BMC has begun to clear out fallen trees with every breather we get in the pattern of strong winds and heavy rain. We are working to ensure normalcy at the earliest said Aaditya Thackeray.

News English Title: Tauktae cyclone environment minister Aaditya Thackeray visits control room to review the situation news updates.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x