30 May 2023 1:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Symphony Share Price | कुलर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 3,00,000 टक्के परतावा दिला, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 30 कोटी, स्टॉक डिटेल्स Money Saving Tips | पैसे हाताशी थांबत नाहीत का? फॉलो करा या 8 टिप्स आणि आयुष्यातील आर्थिक बदल पहा शिंदे गट धोक्यात! आज निवडणूक झाल्यास शिंदे यांच्या शिवसेना गटाला केवळ 5.5% मते मिळतील, मनसे सर्वेतही शिक्कल नाही - सर्वेक्षण रिपोर्ट Adani Enterprises Share Price | 1 महिन्यात अदानी एंटरप्रायझेस शेअरने 32% परतावा दिला, अदानी स्टॉक तेजीत, ब्लॉकडीलची जादू काय आहे? Axita Cotton Share Price | सुवर्ण संधी! एक्झीटा कॉटन कंपनी 28 रुपयाचा शेअर 56 रुपयांना बायबॅक करणार, रेकॉर्ड डेटच्या आधी फायदा घ्या Bajaj Steel Industries Share Price | बजाज स्टील इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणूकदारांना 1500 टक्के परतावा दिला, आता 60 टक्के लाभांश देणार Personal Loan | पर्सनल लोन घेताना या नकळत होणाऱ्या चुका टाळा, पर्सनल लोन घेताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, जाणून घ्या
x

DSP Mutual Fund | या फंडाच्या मासिक एसआयपी योजनेतून 39 लाखाचा परतावा, हा मल्टिबॅगर फंड लक्षात ठेवा

DSP mutual fund

DSP Mutual Fund | आजच्या महागाईच्या काळात पैसे बचत करणे आणि ते गुंतवणे खूप अवघड आहे. महागाईमुळे लोकांना बचत करणे जमतच नाही. पण आर्थिक संकट टाळण्यासाठी तुमच्याकडे पैसे असले पाहिजे. पालक म्हणून जबाबदारी पूर्ण करताना मुलांचे उच्च शिक्षण, त्यांचे लग्न, स्वतःचे घर या सर्वांसाठी खूप पैसे लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही गुंतवणूकीची एक संधी शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अश्याच एका योजनेबद्दल सांगणार आहोत. नक्की वाचा.

स्मॉल कॅप फंड :
स्मॉल कॅप फंड मधील गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकतात. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर नक्कीच चांगला परतावा तुम्ही मिळवु शकता. आणि आलेला परतावा तुम्ही लार्ज कॅप आणि मिड कॅप ओरिएंटेड फंडांत गुंतवून आणखी नफा मिळवू शकता. याचे कारण असे की स्मॉल कॅप फंडमध्ये मिड कॅप आणि लार्ज कॅप म्युच्युअल फंडांपेक्षा अधिक वेगाने उलाढाल होत असते.

बंपर परतावा :
डीएसपी स्मॉल कॅप फंड ही योजना नियमित परतावा आणि उत्तम वाढीचे एक जबरदस्त उदाहरण आहे. ही योजना एक स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना आहे ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना अतिशय चांगला परतावा मिळवून दिला आहे. या स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेने मागील वर्षी आपल्या SIP गुंतवणूकदारांना 15.50 टक्के परतावा मिळवून दिला. तर या कालावधीत गुंतवणूकदारांना मिळालेला वार्षिक परतावा सुमारे 29.90 टक्के होता.

60 टक्केहून अधिक परतावा :
मागील दोन वर्षांमध्ये ह्या फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांहून अधिक परिपूर्ण परतावा मिळवून देऊन खुश केले आहे. फंडाचा वार्षिक परतावा दर 53.60 टक्क्यांहून अधिक आहे. मागील तीन वर्षांत, या म्युच्युअल फंड योजनेने SIP मार्फत गुंतवणूक करणाऱ्यांना 81 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे, या फंडाचा प्रती वार्षिक परतावा दर सुमारे 42.75 टक्के च्या आसपास आहे. आपण जर मागील पाच वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास आपल्या कळेल की, या योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना एकूण 87.50 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर या कालावधीत मिळालेला वार्षिक परतावा सुमारे 25.45 टक्के आहे.

10,000 मासिक SIP चा परतावा 39 लाख :
या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी नक्कीच जबरदस्त परतावा मिळवला आहे. मागील 10 वर्षांत, या फंडाने आपल्या SIP गुंतवणूकदारांना 230 टक्क्यांहून अधिक असा जबरदस्त परतावा दिला, आणि त्याचा वार्षिक दर 22.65 टक्के इतका होता. या व्याज परतावा दराने आपण जर 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक केली ते आपल्याला पुढील 10 वर्षांत 39 लाख रुपयांचा परतावा मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | DSP Mutual Fund return and benefits to investors on 1 August 2022.

हॅशटॅग्स

DSP mutual fund(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x