
HDFC Mutual Fund | जर तुम्ही सध्या गुंतवणूक करण्यासाठी एखादी योजना शोधत असाल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका जबरदस्त गुंतवणूक पर्यायाबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही फक्त 100 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. ही योजना तुम्हाला बंपर परतावा कमावून देऊ शकते. आपण ज्या गुंतवणूक योजनेची माहिती जाणून घेणार आहोत, ही HDFC म्युच्युअल फंडाची खास योजना आहे. ही म्युचुअल फंड योजना एक प्रकारची ओपन एंडेड गुंतवणूक स्कीम आहे. यात गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही हवे तेव्हा त्यातून पैसे काढू शकता.
11 नोव्हेंबरपासून गुंतवणूक सुरू :
HDFC म्युचुअल फंडाने ही न्यू फंड ऑफर सुरू केली असून याचे सबस्क्रिप्शन 11 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झाले आहे. तुम्ही या न्यू फंड ऑफरमध्ये 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत पैसे जमा करू शकता. या एचडीएफसी बिझनेस सायकल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान 100 रुपये जमा करावे लागतील. सध्या या म्युचुअल फंड योजनेत एक्झिट लोड म्हणून 1 टक्के शुल्क आकारले जाते.
एक्झिट लोड चार्ज :
समजा तुम्ही या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणुक सुरू केल्यावर एक वर्षाच्या आत योजनेतून बाहेर पडलात तर तुम्हाला काढलेल्या एकूण रकमेवर एक्झिट लोड चार्ज भरावा लागेल. जर तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असेल आणि भरघोस उत्पन्न कमवायचे असेल तर ही म्युचुअल फंड योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
सल्ला घेतल्यानंतर गुंतवणूक करा :
या म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही किमान 100 रुपये जमा करू शकता. दीर्घ काळात ही योजना तुम्हाला जबरदस्त कमाई करून देऊ शकते. या व्यतिरिक्त, कोणत्याही म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही आर्थिक तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक केल्यास नुकसान होण्याची शक्यता कमी असेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.