 
						HDFC Mutual Fund | ‘एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड’ ने त्याच्या स्थापनेपासून आता पर्यंत लोकांना 261.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंडाच्या श्रेणीत ही एक उत्कृष्ट कामगिरी करणारी योजना मानली जाते. ‘एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड’ ही म्युचुअल फंड योजना 1 फेब्रुवारी 1994 रोजी सुरू करण्यात आली होती. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 63.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाऊन घेऊ या म्युचुअल फंडाची संपूर्ण माहिती. (HDFC Balanced Advantage Fund – Growth latest NAV)
‘एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हांटेज हायब्रीड फंड’ ही म्युचुअल फंड योजना बॅलन्स्ड अॅडव्हांटेज हायब्रिड श्रेणीतील म्युचुअल फंड योजना आहे, ज्याचा उद्देश इक्विटी आणि कर्ज गुंतवणुकीच्या मिश्रणाद्वारे दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळवून देणे आहे. वेगवेगळ्या मालमत्ता गुंतवणूक बाजाराच्या हालचालींवर वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात, आणि त्यांचा एकमेकांशी संबंध अल्प असतो. त्यामुळे या योजनेतील गुंतवणूकीची जोखीम प्रत्येक वर्गासह कमी झाली आहे.
‘एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड’ गुंतवणूकदारांना स्थापनेपासून 261.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत योजनेचा सरासरी वार्षिक परतावा 13.48 टक्के होता. या म्युचुअल फंड योजना मागील 3 वर्षांमध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 17.85 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे, जो 10.18 टक्के या श्रेणी सरासरी परताव्यापेक्षा खूप जास्त आहे.
या म्युचुअल योजनेने मागील 5 वर्षांमध्ये लोकांना एकूण 78.16 टक्के आणि सरासरी वार्षिक 12.24 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंडामुळे गुंतवणुकदारांना तोटा देखील सहन करावा लागला आहे. या म्युचुअल फंड योजनेने शेअर बाजाराच्या कमजोरीच्या काळात 30.36 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. पण मात्र वाढत्या काळात या योजनेने 76.36 टक्के एकूण परतावा दिला आहे.
एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हांटेज म्युचुअल फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये 63.2 टक्के इक्विटी, 24.5 टक्के कर्ज आणि 10.1 टक्के रोख यांचा समावेश आहे. एचडीएफसी, एसबीआय आणि आयसीआयसीआय सारख्या मोठ्या बँकांचा इक्विटी एक्सपोजरमध्ये आर्थिक हिस्सा 34 टक्के आहे. त्याच वेळी, ऊर्जा साठ्याचा हिस्सा 22.6 टक्के आहे. म्युचुअल फंड पोर्टफोलिओमध्ये एनटीपीसी, कोल इंडिया, गेल यासारख्या कंपनीच्या शेअरचा समावेश होतो. कर्ज होल्डिंग्समध्ये, या म्युचुअल फंड योजनेने सार्वभौम 18.06 टक्के आणि AAA रेट केलेल्या गुंतवणुकीला 5.5 टक्के कमाल वेटेज दिले आहे.
कोणी गुंतवणूक करावी? :
एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंडाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे इक्विटी आणि कर्ज गुंतवणुकीच्या मिश्रणाद्वारे दीर्घ काळात गुंतवणुकदारांना मजबूत परतावा मिळवून देणे. दीर्घ मुदतीसाठी इक्विटी आणि कर्ज साधनांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे. मात्र म्युचुअल फंड योजना या बाजारातील जोखमीच्या अधीन असतात हे लक्षात ठेवूनच गुंतवणूक केले तर नुकसान होणार नाही.
म्युचुअल फंड रेटिंग :
एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हांटेज म्युचुअल फंड योजनेला सातत्यपूर्ण ट्रॅक रेकॉर्डसाठी मॉर्निंगस्टार फर्मकडून 5-स्टार रेटिंग देण्यात आले आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या पोर्टफोलिओचे सरासरी परताव्याचे ‘मध्य विचलन’ 19.9 असून त्याचा बीटा 0.96 आहे. एकूण शेअर बाजाराच्या कामगिरीच्या तुलनेत या म्युचुअल फंड योजनेचा बीटा योजनेची अस्थिरता दाखवत आहे.
या म्युचुअल फंडाचा बीटा 1 पेक्षा कमी आहे, त्यावरून असे कळते की तो एकूण बाजारापेक्षा कमी अस्थिर आहे. परंतु या म्युचुअल फंड योजनेत उच्च जोखम आहे. म्युचुअल फंड योजना मागील काही वर्षात दिलेला उच्च परतावा पुढील काळात ही देतील यांची कोणतीही गॅरंटी नाही. म्हणजेच भविष्यात तुम्हाला म्युचुअल फंड योजना चांगले रिटर्न देईलच यांची शाश्वती नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		