 
						HDFC Mutual Fund | ज्या गुंतवणूकदारांना कमी जोखीम घेऊन चांगला परतावा मिळवायचा आहे त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंड योजना दीर्घ कालावधी मध्ये जबरदस्त परतावा देतात. भारतात अनेक मोठे म्युच्युअल फंड योजना आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना दुप्पट नाही तर तिप्पट परतावा मिळवून दिला आहे. आज आपण अश्याच एका मोठ्या म्युचुअल फंड कंपनीची माहिती घेणार आहोत, ती कंपनी आहे एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी. एचडीएफसी म्युच्युअल फंड ही त्याची उपकंपनी आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांची छप्पर फाड परतावा मिळवून दिला आहे. आज आम्ही या लेखात तुम्हाला एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या योजनांची माहिती देणार आहोत, ज्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे अडीच पटीपर्यंत वाढवले आहेत. जर तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले असते तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता अडीच लाख रुपये झाले असते.
एचडीएफसी स्मॉल कॅप फंड :
सर्वप्रथम, एचडीएफसी स्मॉल कॅप फंडाबद्दल जाणून घेऊ. या फंडाने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा दिला आहे. याच योजनेत, मागील पाच वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे अडीचपट वाढले आहेत. या योजनेत, गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये 5 वर्षांत 2.5 लाख रुपये झाले आहे. तुम्ही या योजनेत किमान 5000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. गेल्या महिन्याच्या अखेरीस या फंडाची मालमत्ता र12,913 कोटी रुपये होती.
HDFC लार्ज आणि मिड कॅप फंड :
एचडीएफसी लार्ज अँड मिड कॅप फंडानेही मागील पाच वर्षांत खूप चांगला परतावा दिला आहे. या योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 14 टक्के दराने परतावा मिळवून दिला आहे. या परताव्याच्या दृष्टीने, मागील 5 वर्षांमध्ये गुंतवलेले 1 लाख रुपये आता 2 लाख रुपये झाले आहे. मागील महिन्याच्या आकडेवारीनुसार या फंडाची एकूण मालमत्ता 2904 कोटी रुपये होती. या योजनेत किमान गुंतवणूक मर्यादा 5000 रुपये आहे.
HDFC मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंड :
HDFC मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 5 वर्षात चांगला परतावा दिला आहे. या फंडाचा मागील 5 वर्षांचा परतावा 15 टक्के आहे. या योजनेमुळे 5 वर्षांत गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये गुंतवणुकीचे 2 लाख रुपये झाले आहेत. गेल्या महिन्याच्या आकडेवारीनुसार फंडाची एकूण मालमत्ता 30,949 कोटी रुपये होती. या योजनेची किमान गुंतवणूक मर्यादा 5000 रुपये आहे.
HDFC लाँग टर्म अॅडव्हांटेज फंड :
एचडीएफसी लाँग टर्म अॅडव्हांटेज फंड ही एक अशी योजना आहे जिने आपल्या गुंतवणूकदारांना फक्त 5 वर्षांच्या कालावधीत 15 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील 5 वर्षात या फंडाने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे 2 लाखांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. मागील महिन्याच्या आकडेवारीनुसार या फंडाची एकूण मालमत्ता 1363 कोटी रुपये होती.
HDFC टॉप 100 फंड :
HDFC टॉप 100 फंडाने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 12 टक्के दराने परतावा मिळवून दिला आहे. या योजनेमुळे 1 लाख रुपयांवर फक्त 5 वर्षात 80 हजार रुपयांचा नफा झाला आहे. या योजनेत किमान गुंतवणूक मर्यादा 5000 रुपये आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस फंडाची एकूण मालमत्ता 20809 कोटी रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		