
Multibagger Mutual Fund | आपल्या भारतात 1 डिसेंबर 1993 साली एका जबरदस्त लार्ज कॅप फंडाची धमाकेदार एन्ट्री झाली होती. हा फंड ‘फ्रँकलिन इंडिया म्युच्युअल फंडाच्या’ जुन्या योजनेमध्ये सामील असणारा ‘फ्रँकलीन इंडिया ब्ल्यू चीप फंड’ आहे. एकरक्कमी पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना या लार्ज कॅप फंडाने 31 वर्षांमध्ये 75 पटीने रिटर्न मिळवून दिले आहेत.
फ्रँकलिन इंडिया ब्ल्यू चीप फंडात तुम्ही एसआयपी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, हा फंड 18.02% वार्षिक परतावा मिळवून देतो. या फंडाचे ॲसेट अंडर मॅनेजमेंट 7682.65 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर 1.86% एक्सपेन्स रेश्यो आहे.
फ्रँकलिन इंडिया ब्ल्यू चीप फंडाचे एक रक्कमी गुंतवणुकीचे प्रदर्शन :
1993 साली लॉन्च झालेली आहे या फंडाने लॉन्चिंगनंतर 18.04% टक्क्यांचा परतावा मिळवून दिला आहे. हा परतावा वार्षिक आधारावर अवलंबून आहे. समजा 1993 साली गुंतवणूकदाराने या फंडामध्ये 1 लाख रुपयांची रक्कम गुंतवली असती तर आता हे पैसे 75,23,65,860 या आकड्यावर पोहोचले असते.
एक रक्कमी गुंतवणुकीवर वेगवेगळ्या वर्षांत किती टक्के व्याजदर मिळते :
1. एका वर्षात मिळणारे रिटर्न : 8.63%
2. तीन वर्षांत मिळणारे रिटर्न : 16.69%
3. पाच वर्षांत मिळणारे रिटर्न : 17.42%
4. दहा वर्षांत मिळणारे रिटर्न : 13.18%
5. पंधरा वर्षांमध्ये मिळणारे रिटर्न : 12.62%
फ्रँकलिन इंडिया ब्ल्यू चीप फंडाचे SIP गुंतवणुकीवरील प्रदर्शन पाहून घेऊया :
फ्रँकलिन इंडिया ब्ल्यू चीप फंडाच्या एसआयपी गुंतवणुकीचे मागील 31 वर्षांचे आकडे व्हॅल्यू रिसर्चवर पाहायला मिळतात. फंडाने 31 वर्षांमध्ये एसआयपी गुंतवणुकीवर आपल्या ग्राहकांना 18.02% परतावा मिळवून दिला आहे. एसआयपी म्हणजे प्रत्येक महिन्याला गुंतवणूक. ज्या व्यक्तीने फंडाच्या सुरुवातीपासून प्रत्येक महिन्याला 2000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक केली असती तर आतापर्यंत 2.47 कोटी रुपयांचा निधी तयार झाला असता.
फंडाची कामगिरी :
1993 सालचा हा जुना लार्ज कॅप फंड ek इक्विटी इंडेड फंड आहे. या फंडाच्या माध्यमातून लार्ज कॅप म्हणजेच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. हा फंड लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो आणि तिथून मार्केट कॅपिटललायझेशनच्या टॉप 100 कंपन्यांमध्ये शामिल होतो. यामध्ये ज्या कंपन्यांचा ट्रॅक रेकॉर्ड प्रभावशाली आहे त्या कंपन्या सेक्टरमध्ये मार्केट लीडर ठरणार आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.