30 May 2023 12:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Money Saving Tips | पैसे हाताशी थांबत नाहीत का? फॉलो करा या 8 टिप्स आणि आयुष्यातील आर्थिक बदल पहा शिंदे गट धोक्यात! आज निवडणूक झाल्यास शिंदे यांच्या शिवसेना गटाला केवळ 5.5% मते मिळतील, मनसे सर्वेतही शिक्कल नाही - सर्वेक्षण रिपोर्ट Adani Enterprises Share Price | 1 महिन्यात अदानी एंटरप्रायझेस शेअरने 32% परतावा दिला, अदानी स्टॉक तेजीत, ब्लॉकडीलची जादू काय आहे? Axita Cotton Share Price | सुवर्ण संधी! एक्झीटा कॉटन कंपनी 28 रुपयाचा शेअर 56 रुपयांना बायबॅक करणार, रेकॉर्ड डेटच्या आधी फायदा घ्या Bajaj Steel Industries Share Price | बजाज स्टील इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणूकदारांना 1500 टक्के परतावा दिला, आता 60 टक्के लाभांश देणार Personal Loan | पर्सनल लोन घेताना या नकळत होणाऱ्या चुका टाळा, पर्सनल लोन घेताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, जाणून घ्या Multibagger Mutual Fund | ही म्युच्युअल फंड योजना गुंतवणूकदारांना 54 टक्के वार्षिक परतावा देतेय, बँके एफडी पेक्षा 9 पट परतावा मिळेल
x

Mutual Funds | या म्युचुअल फंडने दिला गुंतवणूकदरांना 570 टक्के परतावा, करोडपती होण्याची सुवर्ण संधी

mutual fund, investment, gain, profit

Mutual Fund | जेव्हा आपण गुंतवणूक करण्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला हवा तसा परतावा देणारी योजना भेटत नाही. या उलट म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करते वेळी तुम्हाला शंका आणि गुंतवणुकीतील जोखीम या सर्व विचारांचा सामना करावा लागू शकतो. जसे की गुंतवणूक सुरक्षित आहे की नाही. तुम्ही जास्त परतावा मिळेल या आशेने मोठी गुंतवणूक करा किंवा लहान गुंतवणूक करा, कोणत्याही गुंतवणुकीत जोखीम ही नेहमीच असते. अशा परिस्थितीत, ज्या गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीत जोखीम आणि कमी परतावा या दोन्हींचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी एकच चांगला पर्याय आहे तो म्हणजे मल्टी-कॅप म्युच्युअल फंड. आपण आज याची माहिती घेऊ.

क्वांट अॅक्टिव्ह फंड :
डायरेक्ट प्लॅन-ग्रोथ हा क्वांट म्युच्युअल फंडाचा ओपन-एंडेड मल्टी-कॅप फंड आहे. हा त्याच्या श्रेणीतील एक छोटा फंड आहे. या फंडाची चालू वर्षात AUM 2106.97 कोटी होती. त्याची एनएव्ही 19 एप्रिल 2022 रोजी दिलेल्या आकडेवारी नुसार 453.7249 रुपये एवढी आहे. त्याचे खर्चाचे प्रमाण 0.5% टक्के आहे, ज्याची तुलना त्याच्या श्रेणीतील इतर फंड सोबत केली असता त्याच्या सरासरी खर्च गुणोत्तरापेक्षा कमी आहे. ह्या निधीचे व्यवस्थापन सध्या संजीव शर्मा आणि अंकित पांडे हे करत आहेत.

शॉर्ट रिस्क फंड :
हा फंड गुंतवणुकीसाठी खुला आहे. ह्या फंडात गुंतवणूक करणे कमी जोखमचे आहे. हा फंड एक मल्टी-कॅप फंड असल्यामुळे, त्यात लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप अश्या फर्म्सचा परिपूर्ण आणि वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ पाहायला मिळतो. हा फंड आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन नफा मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. क्रिसिल संस्थेने याला फंडला 5-स्टार रेटिंग दर्शवले आहे. या फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान एकरकमी गुंतवणुकीची रक्कम 5000 रुपये असावी लागते तर एसआयपीसाठी ती गुंतवणूक रक्कम किमान 1000 रुपये असावी लागते. याचे आणखी एक वैशिष्ट्य असे की त्या फंड मध्ये लॉक-इन कालावधी तसेच शून्य एक्झिट लोड नाही.

गुंतवणूक निधीवरील परतावा :
या फंडात गुंतवलेल्या रकमेवर मिळणारा पूर्ण परतावा पाहिल्यास, 1 वर्षात 41.28 टक्के, 2 वर्षात 183.58 टक्के, 3 वर्षात 142.85 टक्के, 5 वर्षात 200.62 टक्के आणि स्थापनेपासून आतापर्यंत 513.99 टक्के परतावा ह्या फंड ने मिळवून दिला आहे. एकरकमी गुंतवणुकीवर वार्षिक परतावा 1 वर्षात 41.28 टक्के, 2 वर्षात 68.16 टक्के, 3 वर्षात 34.34 टक्के, 5 वर्षात 24.61 टक्के आणि स्थापनेपासून 21.59% आहे.

गुंतवणुकीपूर्वी SIP परतावा तपासा :
जर आपण या म्युचुअल फंडाच्या SIP गुंतवणुकीवरील पूर्ण परताव्याचे निरीक्षण केले तर तो 1 वर्षात 14.28 टक्के, 2 वर्षात 60.52 टक्के, 3 वर्षात 91.87 टक्के आणि 5 वर्षात 120.73 टक्के झाला आहे. SIP वर वार्षिक परतावा 1 वर्षात 27.59 टक्के, 2 वर्षात 53.18 टक्के, 3 वर्षात 47.26 टक्के आणि 5 वर्षात 32.31 टक्के आहे.

फंडाचा गुंतवणूक पोर्टफोलिओ :
फंडाचे इक्विटीमध्ये 93.18 टक्के एक्सपोजर आहे. यापैकी 37.24 टक्के गुंतवणूक लार्ज-कॅप्समध्ये, 13.46 टक्के गुंतवणुकीचा हिस्सा मिड-कॅप्समध्ये आणि 28.38 टक्के गुंतवणुकीचा हिस्सा स्मॉल-कॅप मध्ये गुंतवला आहे. या फंडाच्या पोर्टफोलिओ मध्ये सेवा, बांधकाम, ग्राहक वस्तू, आर्थिक, धातू आणि खाण क्षेत्रामध्ये बहुतांश गुंतवणूक आहे. मोठे खाजगी कंपनी जसे की वेदांता लिमिटेड, आयटीसी लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया, लिंडे इंडिया लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेड या सर्व मोठा कंपनीमध्ये म्युचुअल फंडामार्फत गुंतवणूक केली आहे. नवीन गुंतवणूकदारांनी पैसे लावण्याआधी नेहमी काळजी घ्यावी की म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करताना बाजाराच्या अधीन राहून जोखीम असते.

गुंतवणुकीचा आकार आणि जोखीम क्षमता :
तुमची आर्थिक उद्दिष्टे, गुंतवणुकीचा आकार आणि जोखीम क्षमता ह्याला अनुसरून जुळणारी म्युच्युअल फंड योजनाच गुंतवणुकीसाठी निवडा. जर तुम्ही एक सकारात्मक दृष्टिकोन असलेले गुंतवणूकदार असाल तर काही दिवस किंवा काही आठवडे पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही डेट म्युच्युअल फंडासारख्या लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करावी, वराच फायदा होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual fund for long term investment and it’s benifits on 23 July 2022

 

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x