
Mutual Fund | 2022 या वर्षात म्युच्युअल फंडांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या वर्षी शेअर बाजारात जबरदस्त तेजीमुळे सर्वकालीन उच्चांकाची नोंद पहायला मिळाली. शेअर बाजारातील या तेजीमुळे म्युच्युअल फंडांनाही जबरदस्त फायदा मिळाला आहे. नुकताच सेन्सेक्सने 63,000 अंकांचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. 2023 मध्ये देखील ही तेजी कायम राहील, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी 5 स्टार रेटेड इक्विटी म्युच्युअल फंड योजनांची माहिती घेऊन आलो आहोत, जे तुमचे पैसे झटपट वाढवतील.
क्वांट स्मॉल कॅप फंड :
क्वांट स्मॉल कॅप फंडला बहुतेक गुंतवणूक तज्ञांनी सकारात्मक रेटिंग दिली आहे. क्वांट स्मॉल कॅप फंडला व्हॅल्यू रिसर्च, GROW आणि मॉर्निंगस्टारकडून 5 स्टार रेटिंग देण्यात आले आहे. क्रिसिलनेही क्वांट स्मॉल कॅप म्युचुअल फंडला पाहिला क्रमांक दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने आपल्या समवयस्क स्पर्धक फंडांच्या तुलनेत अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील तीन वर्षांत 55 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाच्या टॉप होल्डिंग्समध्ये ITC, अंबुजा सिमेंट्स, IRB इन्फ्रा, हिमाचल फ्युचरिस्टिक या कंपनीच्या शेअर्सचा समावेश आहे. या म्युचुअल फंड योजनेत तुम्ही प्रति महिना 500 रुपये जमा करून एसआयपी गुंतवणूक सुरू करु शकता. या योजनेत एकरकमी गुंतवणुकीची किमान गुंतवणूक रक्कम मर्यादा 5000 रुपये आहे. पण या म्युचुअल फंडमध्ये जोखम प्रमाण खूप जास्त आहे. गुंतवणूक करताना जोखीम फॅक्टर विचारात घेणे आवश्यक आहे.
कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंड :
कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंड ही एक लार्ज कॅप म्युचुअल फंड स्कीम आहे. कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंड लार्जकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. या लार्जकॅप स्टॉकमध्ये दीर्घ मुदतीसाठी जास्त परतावा देण्याची क्षमता असते. व्हॅल्यू रिसर्च आणि ईटी मनी, आणि grow यांनी या म्युचुअल फंड योजनेला 5-स्टार रेटिंग दिली आहे. या म्युचुअल फंडाच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक यासारख्या मोठ्या दिग्गज कंपनीचे शेअर्स सामील आहेत. या म्युचुअल फंडाने वार्षिक आधारावर आपल्या गुंतवणूकदारांना 3 वर्षात 19 परतावा कमावून दिला आहे. तर मागील 5 वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने 16 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाचे AUM 8,500 कोटी रुपये आहे, जी त्याच्या इतर काही स्पर्धक म्युचुअल फंडांच्या तुलनेत कमी आहे.
अॅक्सिस मिडकॅप फंड :
अॅक्सिस मिडकॅप फंड आपल्या नावाप्रमाणेच मिडकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. मॉर्निंगस्टार आणि व्हॅल्यू रिसर्च फर्मने या म्युचुअल फंड योजनेला 5-स्टार रेटिंग दिली आहे. या म्युचुअल फंड मधील 92 टक्के रक्कम इक्विटी शेअर्समध्ये गुंतवली जाते. या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये ICICI बँक, चोलामंडलम आणि ट्रेंट यांसारख्या मोठ्या कंपनी सामील आहेत. तुम्ही या फंडात किमान 100 रुपये जमा करून एसआयपी गुंतवणूक सुरू करु शकता. यात किमान एकरकमी गुंतवणुक मर्यादा रक्कम 500 रुपये आहे. या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 3 वर्षांत वार्षिक सरासरी 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. दीर्घ काळासाठी गुंतवणूक करून पैसे दुप्पट करु इच्छिणाऱ्या लोकांसाठी ही म्युचुअल फंड योजना खूप फायद्याची ठरू शकते.
टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड :
2023 या वर्षात गुंतवणुक करण्यासाठी अनेक ELSS किंवा टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत. तज्ञांनी काही टॅक्स सेवींग म्युचुअल फंड योजनांची लिस्ट दिली आहे, त्यात अॅक्सिस लाँग टर्म इक्विटी फंड, कॅनरा रोबेको इक्विटी टॅक्स सेव्हर फंड, मिरे अॅसेट टॅक्स सेव्हर फंड, इन्वेस्को इंडिया टॅक्स प्लॅन फंड, डीएसपी टॅक्स सेव्हर फंड, क्वांट टॅक्स प्लॅन या योजना सामील आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.