26 March 2025 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, UPI आणि ATM वापरून 1 मिनिटात EPF खात्यातून 1 लाख रुपये काढता येणार Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या दरात मजबूत वाढ झाली, लग्नाच्या सीझनमध्ये तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, ताड तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IREDA TATA Motors Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने दिला खरेदीचा सल्ला, BUY रेटिंग सह टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS GTL Infra Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ जीटीएल इन्फ्रा शेअर, महत्वाची अपडेट आली - NSE: GTLINFRA Trident Share Price | ट्रायडंट शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: TRIDENT GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअरमध्ये घसरण, महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अनुमान जाणून घ्या - NSE: GTLINFRA
x

Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | तुम्ही आत्तापर्यंत SIP तसेच म्युच्युअल फंड ही नावे बऱ्याचदा ऐकली असतील. एसआयपी तसेच म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे एक साधन आहे. जे सध्याच्या काळात सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे. तशा इतरही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीच्या योजना मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तरीसुद्धा जगभरात अनेक लोक एसआयपी करून आपलं भवितव्य सुरक्षित करत आहेत.

म्युच्युअल फंड आणि एसआयपी या दोन्हीही योजना मार्केट लिंक्ड योजना आहेत परंतु शेअर बाजारातील जोखीमेपेक्षा या दोन फंडांमध्ये कमी जोखीम पत्करावी लागते. त्याचबरोबर जास्तीचे व्याजदर आणि परताव्याची 100% हमी मिळत असल्याने लोकांचा या फंडांवर अधिक विश्वास बसत चालला आहे.

गुंतवा केवळ 500 रुपये :

तुम्ही SIP च्या माध्यमातून कमी पैशांत देखील बचत करू शकता. यामध्ये तुम्ही 500 रुपयांपासून सुरुवात करू शकता. त्याचबरोबर दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून तुम्ही चक्रवाढ व्याजाचा फायदा घेऊ शकता. आतापर्यंत अनेकांनी एसआयपीच्या माध्यमातून दीर्घकालीन गुंतवणूक करून कोटींची रक्कम कमावली आहे. तुम्हाला सुद्धा कोट्याधीश व्हायचं असेल तर, एक जबरदस्त फॉर्म्युला शिकून घ्या. कॅल्क्युलेशन करण्यास सोपे जाईल.

कोट्यधीश बनवणारा 12X30X12 हा फॉर्म्युला आहे जबरदस्त :

तुम्ही जर एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करत असाल आणि पैशांची बचत करून दीर्घकाळात करोडोंचा फंड तयार करत असाल तर, 12X30X12 हा फॉर्म्युला तुमची अत्यंत मदत करू शकेल. 12 म्हणजे 12% वार्षिक टॉप अप त्यानंतर 30 म्हणजे एकूण 30 वर्षांसाठी करावयाची गुंतवणूक आणि शेवटचे 12 म्हणजे 12% ने मिळणारा परतावा.

एसआयपीतून पैसे गुंतवून बनाल कोटींचे मालक :

समजा एखाद्या व्यक्तीने 1000 रुपयांची एसआयपी सुरू केली असेल तर, त्याला संपूर्ण वर्षभर 1000 रुपये गुंतवावे लागतील. त्यानंतर 12% गुंतवणुकीचा टॉप अप वाढवावा लागेल. म्हणजेच तुम्हाला एक हजारावर 120 रुपये वाढवून 1120 रुपयांची गुंतवणूक दुसऱ्या वर्षाला करावी लागेल. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक वर्षाला 12% ने टॉप अप करून पैसे जमा करावे लागतील.

गुंतवणुकीची ही 12% वाढ तुम्हाला सातत्याने 30 वर्ष सुरू ठेवायची आहे. 12% टॉप अपनुसार तुम्ही 30 वर्षांत एकूण 28,95,992 रुपयांची गुंतवणूक कराल. त्यानंतर पुढील 12% म्हणजेच परताव्याचे 12%. यानुसार तुम्हाला व्याजाचे 83,45,611 रुपये मिळतील. याचाच अर्थ तुम्हाला एकूण मिळणारी रक्कम 1,12,41,603 रुपये असेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mutual Fund SIP 24 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(268)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या