 
						Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी गुंतवणुकीतून नफा मिळवला आहे. ज्या व्यक्तींना दीर्घकाळापर्यंत मोठा कॉर्पस तयार करायचा आहे त्या व्यक्तींसाठी म्युच्युअल फंड SIP हा पर्याय अत्यंत महत्त्वाचा आणि फायद्याचा ठरू शकतो. आज आम्ही या बातमीपत्रातून तुम्ही 25 वर्षांत 10 कोटींची रक्कम कशी तयार करू शकता याबद्दल माहिती सांगणार आहोत. तुम्हाला 10 कोटींची रक्कम जमा करायची असेल तर, किती रुपयांची मासिक SIP तयार करावी लागेल जाणून घ्या.
गुंतवणूक करताना या 2 गोष्टींची खास काळजी घ्या :
1. गुंतवणुकीच्या दोन प्रमुख उद्दिष्ट्यांपैकी पहिले म्हणजे तुम्ही ज्या योजनेत किंवा ज्या फंडमध्ये गुंतवणूक करत आहात त्याचे व्याजदर निश्चित आहे की नाही ते तपासा. त्याचबरोबर वार्षिक आधारावर किती व्याजदर दिले जाते हे देखील तपासा.
2. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या फंडमध्ये किती रुपयांची मासिक गुंतवणूक करत आहात. कारण की या दोन गोष्टी निश्चित असतील तरच तुम्ही तुम्हाला हवा तेवढा कॉर्पस तयार करू शकता.
10 वर्षांच्या स्टेप-अपमुळे लवकरात लवकर गाठाल यशाची पायरी :
समजा तुम्हाला 10 कोटींची रक्कम तयार करायची आहे आणि तुमच्याकडे केवळ 25 वर्षांचा काळ उरला आहे तर, तुम्ही स्टेप-अप करून देखील मोठा फंड तयार करू शकता. समजा तुमची पहिली SIP 24,000 रुपये आहे आणि 10% टक्के पुढच्या वर्षी स्टेप-अप केली आहे तर, अशा पद्धतीने तुम्हाला पुढील 10 वर्षे 10% ने स्टेप-अप करायचे. तुमच्या प्रत्येक वर्षाच्या गुंतवणुकीवर SIP 12% नुसार अनुमानीत परतावा देते. ज्यामुळे केवळ 25 वर्षांत तुमच्या खात्यात 10.11 कोटींची रक्कम तयार होऊ लागते.
काही गोष्टींची एक विशेष काळजी घेणे गरजेचे : तुम्ही दीर्घकाळाच्या गुंतवणुकीसाठी SIP हे माध्यम निवडले असेल तर, कोणत्याही प्रकारचा गॅप न पडता तुम्ही सातत्याने गुंतवणूक केली पाहिजे. जर तुम्हाला काही कारणांमुळे ब्रेक घ्यावा लागला तर, मोठा फंड तयार करण्यासाठी तुम्हाला आणखीन वर्षे लागतील.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		