
Mutual Fund SIP | सध्याच्या घडीला बहुतांश व्यक्ती शेअर बाजारात आपले पैसे दुप्पटीने वाढण्यासाठी गुंतवणूक करतात. शेअर बाजारातील योजनांसह गुंतवणूकदारांना एसआयपी म्युच्युअल फंड योजना देखील फायद्याच्या वाटत आहेत. एसआयपी म्युच्युअल फंडांच्या योजना या शेअर बाजाराशी निगडित असल्या तरीही कमी जोखीमेच्या असतात. यामध्ये तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून भडगंज संपत्ती तयार करू शकता.
गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय बेस्ट :
आज या बातमीपत्रातून म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या आणि करोडोंच्या घरात परतावा कसा काय मिळू शकतो याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर म्युच्युअल फंडांत गुंतवणूक एसआयपी की, एक रक्कमी गुंतवणूक यांपैकी कोणता पर्याय बेस्ट राहील याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
पुढील 3 ते 4 वर्षांमध्ये 50 लाखांचे घर खरेदी करण्याचा विचार करताय :
बहुतांश व्यक्तींना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करायचे असते. मोठमोठ्या फ्लॅटमध्ये राहण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. आता अशा मोठ्या फ्लॅटच्या किंमती 50 लाखांच्याही पुढे सुरू आहेत. तुम्हाला लवकरात लवकर 3 ते 4 वर्षांत 50 लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी करण्याकरिता पैशांची जमत म्हणून करायची असेल तर, म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. किती कालावधीत त्याचबरोबर किती पैशांची रक्कम गुंतवून तुम्ही 50 लाख रुपयांचा फंड तयार करू शकता जाणून घ्या.
SIP गुंतवणूक बनवेल लाखोंचे मालक :
समजा गुंतवणूकदाराने 3 वर्ष आणि 5 महिन्यांच्या कालावधीमध्ये प्रत्येक महिन्याला मासिक 1 लाख रुपये गुंतवले तर, 3 वर्ष आणि 5 महिन्यांच्या कार्यकाळात त्या व्यक्तीजवळ 50 लाखांचा फंड तयार होईल. SIP गुंतवणुकीची पॉवर एवढी जबरदस्त आहे की, तुम्हाला वार्षिक आधारावर 12% व्याजदर मिळत राहील.
3 वर्ष आणि 5 महिन्यांच्या काळामध्ये गुंतवणूकदाराची 42 लाखांची सदर गुंतवणूक होईल आणि 10 लाख 39 हजार 778 रुपयांचे व्याज प्राप्त होईल. म्हणजेच मॅच्युरिटीवर तुम्हाला
52 लाख 39 हजार 778 रुपयांची चांगली बचत करता येईल सोबतच घराचे स्वप्न देखील पूर्ण करता येईल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.