 
						Mutual Funds | मागील काही महिन्यात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना कंगाल केले. बाजारातील अस्थिरता आणि वैश्विक घडामोडी या नकारात्मक गोष्टीमुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. मात्र म्युचुअल फंडानी चांगली कामगिरी केली आहे. आपण जाणून घेऊ अशा स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांच्या कामगिरी बद्दल.
बीओआय एएक्सए स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ :
या फंडात मागील एका वर्षात 35.2 टक्के वाढ झाली आहे. आणि गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंडाची एनएवी 25.75 रुपये आहे. आणि निधीचा आकार 232.13 कोटी रुपये आहे. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 1000 रुपये ने गुंतवणूक करू शकता.
अॅक्सिस स्मॉल कॅप फंड :
या फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मागील एका वर्षात 34.2 टक्के परतावा मिळाला आहे. फंडाची एनएव्ही 63.44 रुपये आहे. या फंडाचा आकार 8410.88 कोटी रुपये आहे. तुम्हाला या फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक करून सुरुवात करू शकता.
कोटक स्मॉलकॅप फंड :
मागील एका वर्षात या फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 31.52 टक्के परतावा मिळाला आहे. या फंडाची एनएव्ही 170.48 रुपये आहे असून निधीचा आकार 6810.75 कोटी रुपये आहे. तुम्हाला या फंडात गुंतवणूक करायची असेल तर किमान रु. 1000 ने गुंतवणूक करू शकता.
निप्पॉन इंडियास्मॉल कॅप फंड :
ह्या फंड च्या परताव्यात चांगली वाढ झाली आहे. मागील एका वर्षात या फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 32.21 टक्के परतावा मिळाला आहे. या फंडाची एनएव्ही 85.03 रुपये असून निधीचा आकार 18933.35 कोटी रुपये आहे. तुम्हाला हा फंडात किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येईल.
टाटा स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ :
या फंडातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला असून मागील एका वर्षात गुंतवणूकदारांना 27.9 टक्के परतावा मिळाला आहे. निधीचे एनएव्ही मूल्य 20.57 रुपये असून निधीचा आकार 1930.55 कोटी रुपये आहे. या फंडातमध्ये आपल्याला किमान 150 रुपयांपासून गुंतवणूक करता येईल.
SBI स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ :
बाजारातील अस्थिरितेच्या काळात वाढलेल्या म्युचुअल फंड पैकी एक हा फंड आहे. मागील एका वर्षात या फंडाने गुंतवणूकदारांना 20.9 % परतावा मिळवून दिला आहे. या फंडाचे एनएव्ही मूल्य107.11 रुपये असून निधीचा आकार 11288.35 कोटी रुपये आहे. आपण यामध्ये किमान 500 रुपयेने गुंतवणूक करू शकता.
क्वांट स्मॉल कॅप फंड :
ह्या फंडने मागील काही काळात आपल्या गुंतवणूकदारांना 53 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला. या फंडाचे एनएव्ही मूल्य 128.38 रुपये असून निधीचा आकार 1465.63 कोटी रुपये इतका प्रचंड आहे. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान रु. 1000 ने सुरुवात करावी लागेल.
ICICI प्रुडेन्शियलस्मॉल कॅप फंड :
या फंडातील परताव्यात मागील एका वर्षात 29.1 टक्के परतावा वाढ झाली आहे. फंडाची एनएव्ही मूल्य 50.54 रुपये आहे असून निधीचा आकार 3464.36 कोटी इतका प्रचंड रुपये आहे. या फंड मध्ये किमान गुंतवणूक 100 रुपयां पासून सुरू होते.
युनियन स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ :
या म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मागील एका वर्षात 27.17 टक्के नफा मिळाला आहे. फंडाचे एनएव्ही मूल्य 28.41 रुपये असून त्याचा आकार 593.77 कोटी रुपये आहे. ह्या किमान रु. 1000 ने गुंतवणूक सुरू करा हमखास नफा होईल.
इन्वेस्को इंडिया स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ :
दीर्घ कालावधीसाठी या फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 24.97 टक्के परतावा मिळाला आहे. फंडाचे एनएव्ही मूल्य 20.32 रुपये असून त्याचा आकार 1173.99 कोटी रुपये इतका प्रचंड आहे. या फंडात किमान 500 रुपये पासून तुम्ही पैसे गुंतवू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		