
Nippon Mutual Fund | निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युचुअल फंड प्रामुख्याने मिड-कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे लावतो. दीर्घकालीन भांडवल वाढीचे उद्देश ठेवून निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युचुअल फंड उच्च दर्जाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो. ज्या कंपन्यामध्ये लार्ज कॅप स्टॉक बनण्याची क्षमता आहे, अशा स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले जाते. या म्युचुअल फंड स्कीमला मॉर्निंगस्टार द्वारे 3 स्टार आणि व्हॅल्यू रिसर्चद्वारे4 स्टार रेटिंग देण्यात आली आहे.
27 वर्षांत मजबूत परतावा :
8 ऑक्टोबर 1995 रोजी या म्युचुअल फंड योजनेचे सुरूवात करण्यात आली होती. या म्युचुअल फंडाने स्थापनेपासून आतपर्यंत 27 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. या फंडाने स्थापनेपासून आपल्या गुंतवणूकदारांना 22.29 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे. 27 वर्षांच्या कालावधीत या म्युचुअल फंडाने 10,000 मासिक SIP वर 13 कोटी परतावा दिला आहे.
निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युचुअल फंड परफॉर्मन्स :
या म्युचुअल फंडाची मागील वर्षभरातील कामगिरी पाहिली तर तुम्हाला समजेल की गुंतवणूकदारांना 10,000 रुपयेच्या मासिक SIP गुंतवणूकीवर 1.27 लाख रुपये परतावा मिळाला आहे. या म्युचुअल फंडाने मागील तीन वर्षांत एसआयपी गुंतवणुकीवर आपल्या गुंतवणूकदारांना 27.53 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे. अशा प्रकारे तीन वर्ष 10,000 रुपयेची मासिक SIP गुंतवणूक केल्यास 3.60 लाख प्रत्यक्ष गुंतवणूक होईल आणि त्यावर 5.31 लाख रुपये परतावा मिळेल. मागील पाच वर्षात 21.10 टक्के वार्षिक SIP रिटर्नसह 10,000 च्या SIP गुंतवणुकीवर 6 लाखाचे रूपांतर 10.08 लाख मध्ये होईल.
SIP वर 13 कोटी परतावा मिळवा :
या म्युचुअल फंडने लोकांना मागील दहा वर्षात 17.37 टक्के परतावा दिला आहे. 10000 रुपयेच्या मासिक SIP सह एकूण गुंतवणूकीवर 29.77 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे. 15 वर्ष कालावधीसाठी 10,000 रुपयेची मासिक SIP गुंतवणूक केल्यास 18 लाख रुपये प्रत्यक्ष गुंतवणूक होईल, आणि त्यावर 65.35 लाख रुपये परतावा मिळाला असता. गेल्या पंधरा वर्षात या म्युचुअल फंडने लोकांना सरासरी वार्षिक 15.71 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 20 वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने 18.99 टक्के सरासरी वार्षिक दराने परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच 20 वर्षात 10,000 मासिक SIP गुंतवणूक केल्यास आता 24 लाखच्या प्रत्यक्ष गुंतवणुकीवर 2.17 कोटी रुपये परतावा मिळाला असता. मागील 25 वर्षांत या म्युचुअल फंडाने सरासरी वार्षिक 22.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. 10,000 रुपयेच्या मासिक SIP गुंतवणूकीवर 30 लाख रुपये प्रत्यक्ष गुंतवणूक झाली असती, आणि त्यावर 8.87 कोटी रुपये परतावा मिळाला असता. जर तुम्ही या म्युचुअल फंडाच्या सुरुवातीपासून 10,000 रुपयेची मासिक SIP गुंतवणूक केली असती, तर तुम्हाला 22.29 टक्के दराने परतावा मिळाला असता. सुरुवातीपासून आतापर्यंत तुमची एकूण गुंतवणूक 32.40 लाख रुपये झाली असती, आणि त्यावर तुम्हाला 13.67 कोटी रुपये परतावा मिळाला असता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.