27 July 2024 7:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Quant Mutual Fund | होय होय! ही आहे मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, बक्कळ परतावा देणाऱ्या फंडाचं नाव नोट करा

Quant Mutual Fund

Quant Mutual Fund| प्रत्येक व्यक्ती आपल्या वेतनातील काही हिस्सा बचत करून गुंतवणूक करण्याची संधी शोधत असतो. जर तुम्ही तुमच्या उत्पन्नातून चांगली बचत करत असून ती एखाद्या योजनेत भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या खूप कामाची आहे. बरेच लोक आपली बचत गुंतवण्यासाठी म्युच्युअल फंडात पैसे लावतात. समजा तुम्हाला शेअर्स मार्केटबद्दल जास्त काही माहित नसेल, पण तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करून बक्कळ पैसा कमवायचा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली पाहिजे. येथे म्युचुअल फंडमध्ये गुंतवलेले पैसे तज्ञामार्फत स्टॉक मार्केटमध्ये गुंतवले जातात.

गुंतवणुक बाजारात अनेक म्युच्युअल फंड योजना उपलब्ध आहेत. त्यापैकी सर्वात जास्त परतावा कमावून देणारी योजना म्हणजे क्वांट म्युच्युअल फंड. क्वांट म्युच्युअल फंडाच्या या चार योजनांनी मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. क्वांट टॅक्स प्लॅन, क्वांट अॅक्टिव्ह फंड, क्वांट स्मॉल कॅप फंड आणि क्वांट मिड कॅप फंड हे जबरदस्त परतावा देणाऱ्या योजना असून लोकांना बक्कळ पैसा कमावून देत आहेत.

क्वांट म्युच्युअल फंडाच्या या चार योजनांनी परतावा देण्याच्या बाबतीत इतर म्युचुअल फंड योजनाना मागे टाकले आहे. मागील 5 वर्षात क्वांट म्युच्युअल फंडाच्या या चार योजनांनी गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. जर आपण क्वांट टॅक्स म्युचुअल फंड प्लॅनची माहिती घेतली तर आपल्याला समजेल की मागील 5 वर्षात या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना 21.80 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे. जर आपण क्वांट ऍक्टिव्ह म्युचुअल फंडाचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की मागील 5 वर्षात या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना 21.60 टक्के CAGR परतावा मिळवून दिला आहे.

क्वांट स्मॉल कॅप फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 20.54 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर क्वांट मिड कॅप म्युचुअल फंड स्कीमने लोकांना 19.63 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 28 सप्टेंबर 2017 रोजी क्वांट म्युचुअल फंडच्या कोणत्याही योजनेत एक लाख रुपये लावले असते, तर आतापर्यंत तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 2.45 ते 2.68 लाख रुपये झाले असते. क्वांट म्युच्युअल फंडाच्या या जबरदस्त परतावा देणाऱ्या योजनांनी वर्षानुवर्षे सुरू असलेल्या म्युच्युअल फंड योजनांना खूप मागे टाकून अव्वल स्थान मिळवले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quant Mutual Fund Scheme for investment and earning huge Return on investment on 1 December 2022.

हॅशटॅग्स

quant mutual fund(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x