3 May 2025 5:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

SBI Mutual Fund | गुंतवणूकदारांनो आता होईल छप्परफाड कमाई, SBI च्या 'या' फंडातून 10 लाखांचे होतील 1 कोटी रुपये

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | एसबीआय अंतर्गत सर्वसामान्यांसाठी त्याचबरोबर गुंतवणूकदारांसाठी विविध प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत. त्याचबरोबर तुम्ही एसबीआयच्या माध्यमातून एसआयपी आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून कोट्यधीश बनू शकता.

आतापर्यंत एसबीआयच्या या म्युच्युअल फंड योजनेने बक्कळ परतावा मिळवून दिला आहे. या योजनेचे नाव स्मॉल कॅप फंड योजना असं आहे. ही योजना 14 वर्षांपूर्वी म्हणजेच 2009 च्या 9 सप्टेंबरला सुरू करण्यात आली होती. समजा एखाद्या व्यक्तीने या योजनेमध्ये सुरुवातीपासूनच 5 हजार रुपयांची गुंतवणूक सुरू केली असती तर, सध्याच्या घडीला हेच पैसे 49.44 लाख रुपये झाले असते. म्हणजेच एकूण 14 वर्षांमध्ये एसबीआयच्या या फंडात प्रति महिना 5 हजारो रुपयांच्या दरानुसार तुम्हाला योजनेत 8.40 लाख रुपये जमा करावे लागतील.

असा होईल 41 लाख रुपयांचा थेट फायदा :
एसबीआयच्या फंडात एखाद्या व्यक्तीने 8.40 लाख रुपयांची रक्कम जमा केली आणि योजनेमधील रक्क 49.44 लाख रुपये तयार झाली तर, तुम्हाला थेट 41.04 लाखांचा फायदा झाला असता. एसबीआयच्या या म्युच्युअल फंडाने एसआयपीमध्ये एकूण 22.85% CAGR फायदा मिळवून दिला आहे. हा फंड गुंतवणूक अधिकारी इक्विटी आर श्रीनिवासन यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू केला गेला होता. ही संपूर्ण माहिती एका रिपोर्टच्या माध्यमातून मिळाली आहे.

10 लाखांचे 1.37 कोटी रुपये :
उदाहरणासाठी समजूया की एखाद्या व्यक्तीने या फंडामध्ये दहा लाख रुपये गुंतवले असते तर, आता हीच रक्कम 1.37 कोटी एवढी झाली असती. एसबीआयच्या या फंडाची मालमत्ता AUM अंतर्गत 20,000 कोटी रुपयांवर येऊन ठेपली आहे. त्याचबरोबर एसबीआयच्या या म्युच्युअल फंडाची योजना सर्वांत जुन्या स्मॉल कॅप फंडांपैकीच एक आहे. या योजनेचे आणखीन एक खास गोष्ट म्हणजे योजनेत 65% मालमत्ता स्मॉल कॅप स्टॉक मध्येच गुंतवले जातात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Mutual Fund 27 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(195)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या