
SIP Calculator | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून कोणताही व्यक्ती करोडोंची रक्कम जमा करू शकतो. यासाठी तुम्हाला कोणत्याही म्युच्युअल फंडात SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करावी लागेल. आज आपण 5 करोड रुपयांची रक्कम जमा करण्यासाठी किती महिन्यांची मासिक SIP करावी लागणार आहे याचा आढावा घेणार आहोत.
प्लॅनिंग महत्त्वाची :
गुंतवणुकीसाठी सर्वप्रथम प्लॅनिंग उत्तम असणे अत्यंत गरजेचे. कारण की, कमी वेळात देखील जास्तीत जास्त फंड तयार करता येऊ शकतो. परंतु जर तुमचे प्लॅनिंग योग्य नसेल आणि गुंतवणुकीविषयी तुम्हाला नॉलेज नसेल तर, होणारे नुकसान तुम्हाला अडचणीत पाडू शकते.
शेअर मार्केट न समजणाऱ्यांसाठी म्युच्युअल फंड बेस्ट ठरेल :
बरेच गुंतवणूकदार शेअर बाजारात झपाट्याने गुंतवणूक करून जास्तीत जास्त पैसे मिळवत आहेत. परंतु शेअर मार्केट, स्टॉक मार्केट याविषयी प्रत्येक व्यक्तीला नॉलेज नसते. त्याचबरोबर शेअर बाजारात जास्त जोखीम देखील असते. जर तुम्हाला जोखीम उचलायची नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंडांसारखे ऑप्शन निवडू शकता. कारण की यामध्ये फार कमी जोखीम असून एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करायची असते.
गुंतवणूकदार SIP च्या माध्यमातून दीर्घकाळासाठी, किंवा रिटायरमेंटकरिता एकरक्कमी रक्कम गुंतवणूक दीर्घकाळासाठी व्याजाचा लाभ घेऊ शकतो. त्याचबरोबर SIP थ्रू तुम्ही महिन्याला देखील पैसे गुंतवू शकता.
5 कोटींची रक्कम जमा करण्यासाठी किती एसआयपी करावी लागेल :
1. 20 वर्षांनंतर तुम्हाला 5 करोड रुपये हवे असतील तर, मासिक एसआयपी 50,000 हजार रुपयांची करावी लागेल.
2. समजा तुम्ही 25 वर्षात करोडपती होणार असाल तर, तुम्ही प्रत्येक महिन्याला 26,500 रुपयांची गुंतवणूक कराल.
3. जर तुम्ही 30 वर्षांत 5 करोड रुपयांपर्यंत पोहोचणार असाल तर, तुम्हाला 14,250 रुपयांची एसआयपी करावी लागेल. अशा पद्धतीने तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या बजेटनुसार आणि सोयीनुसार 5 करोडोंचा फंड तयार करता येईल.
मागील 5 वर्षांत म्युच्युअल फंडने दिलेले रिटर्न पहा :
मागील पाच वर्षांत मल्टी कॅप म्युच्युअल फंड्सने 25% टक्क्यांहून अधिक CAGR दिले आहे. त्याचबरोबर निफ्टी इंडेक्स फंडने 18% वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. एवढेच नाही तर इक्विटी म्युच्युअल फंडने देखील घसघशीत परतावा मिळवून दिला आहे. या सर्व प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये फटाफट पैसे कमावण्यासाठी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीला ब्रेक लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण की गुंतवणुकीच्या सातत्यानेच तुम्ही मोठा फंड तयार करू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.