30 April 2025 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स सेक्टर कंपनी शेअर्स खरेदी करून ठेवा, मोठा अपसाईड परतावा मिळेल - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
x

Smart Investment | झटपट काही मिळत नाही, गुंतवणुकीचे हे 5 नियम पाळा, महिना गुंतवणुकीवर 1.13 कोटी रुपये परतावा मिळेल

Smart Investment

Smart Investment | आज-काल वाढती महागाई लक्षात घेता बहुतांश व्यक्ती एसआयपी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे वळाले आहेत. आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी एसआयपी म्युच्युअल फंडात पैसे लावून कोटींचा परतावा मिळवला आहे. म्युच्युअल फंड ती मार्केट लिंक्ड योजना आहे. बाजारात विविध प्रकारचे म्युच्युअल फंड उपलब्ध. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी हा एकमेव मार्ग आहे. आज आम्ही तुम्हाला एसआयपी गुंतवणुकीविषयी आणि त्यातून होणाऱ्या फायद्याविषयी माहिती सांगणार आहोत.

1. दीर्घकाळासाठी उत्तम पर्याय :
आज या बातमीपत्रातून कोणत्या व्यक्तींसाठी म्युच्युअल फंड योजना योग्य आहे हे आम्ही सांगणार आहोत. काही व्यक्ती असे असतात ज्यांना एसआयपी म्युच्युअल फंडांची गुंतवणूक अनुभवायची असते. यासाठी ते गुंतवणूक क्षेत्रात उतरून एसआयपी सुरू करतात आणि व्याजदराचा अनुभव आजमावतात. परंतु ज्या व्यक्तीला गुंतवणुकी विषयीचे संपूर्ण ज्ञान आहे आणि त्या व्यक्तीला दीर्घकाळासाठी योग्य गुंतवणुकीचा पर्याय हवा असेल तर त्याने एसआयपी म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीत नक्कीच सहभाग दर्शवावा.

2. SIP कंपाऊंडिंग ग्रोथ :
जे व्यक्ती दीर्घकाळासाठी म्हणजेच 15 किंवा त्याहून अधिक वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा प्लॅन करतात त्यांना कंपाऊंडिंग व्याजाचा म्हणजेच चक्रवाढ व्याजाचा लाभ अनुभवता येतो. चक्रवाढ व्याजाचा लाभ म्हणजेच तुमच्या व्याजावर मिळणारे अधिकचे व्याज. समजा तुम्हाला व्याजावर व्याज मिळाले तर, तुमची साधारण गुंतवणूक देखील उच्चांक गाठू शकते.

3. SIP High Return :
एसआयपी गुंतवणुकीची कमालच वेगळी आहे. समजा तुम्ही यामध्ये केवळ दहा हजार रुपयांची मासिक एसआयपी जरी सुरू केली तरीसुद्धा येत्या काळात तुमच्या खात्यामध्ये करोडोंचा फंड तयार झालेला पाहायला मिळेल. ज्या व्यक्तींना आपल्या घराची स्वप्नपूर्ती साकार करायची आहे, त्याचबरोबर रिटायरमेंट फंडासाठी जमवाजमव करून ठेवायची आहे त्यांनी एसआयपी गुंतवणुकीत नक्कीच सहभाग दर्शवावा.

4. एसआयपी इंटरेस्ट :
SIP एसआयपी गुंतवणूक इतर कोणत्याही बँकेतील एफडी योजनेपेक्षा तेव्हा कोणत्याही सरकारी योजनेपेक्षा सर्वाधिक व्याजदर देण्याचा प्रयत्न करते. एसआयपी आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक आधारावर 12% टक्क्यांपर्यंत व्याजदर देते. हे व्याजदर सर्वाधिक असल्यामुळे वर्षभरातच तुम्हाला व्याजाने होणाऱ्या अधिकच्या कमाईचा फंडा लक्षात येतो.

5. लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट :
लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही तुम्हाला हवे तेवढे वर्ष गुंतवणूक करू शकता. एसआयपी हा गुंतवणूकदारांसाठी एक प्रकारचा फ्लेक्झिबल पर्याय मानला गेला आहे. समजा एखाद्या व्यक्तीने 21 वर्षांमध्ये 25.2 लाखांची गुंतवणूक केली असेल तर ही गुंतवणूक त्याला 1.13 कोटी रुपयांवर पोचवेल. अशातच 15 वर्षांमध्ये 18 लाखांची एसआयपी केली असता 50.45 लाख रुपयांचा रिटर्न फंड मिळू शकतो.

महत्त्वाचं :
SIP गुंतवणूक ही शेअर बाजारावर अवलंबून असते. त्यामुळे म्युच्युअल फंडांत गुंतवलेले पैसे तुम्हाला कमी जास्त स्वरूपात म्हणजेच बाजारातील चढ-उताराप्रमाणे मिळणार. समजा तुम्ही 15, 21 किंवा 30 वर्षांसाठी SIP गुंतवणूक करत असाल तर, व्याजदर आणि चक्रवाढ व्याजाचा लाभ शंभर टक्के मिळवू शकता आणि कोटींच्या घरात कमाई करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Smart Investment(102)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या