1 December 2022 9:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Surya Rashi Parivartan | या 3 राशीच्या लोकांनी 16 डिसेंबरपासूनचा काळ सांभाळून पार करावा, कोणत्या राशी पहा RBI e-Rupee | आरबीआय ई-रुपयासाठी इंटरनेट लागणार? सर्वसामान्यांना कसा फायदा होणार समजून घ्या EPF Pension Limit | खासगी नोकरदारांना आता 25000 रुपये पेन्शन मिळणार, तुमचे पैसे 333 टक्क्यांनी असे वाढणार पहा ITR Filling | तुमची यामार्गे सुद्धा कमाई होते का? इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते, टॅक्स भरावा लागणार Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा Money From IPO | हा IPO दुसऱ्या दिवशी 6 पट सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये 55 रुपयांचा प्रीमियम, मोठ्या कमाईचे संकेत Equity Mutual Fund | इक्विटी फंडात पैसे गुंतवता? चांगले फंड कसे निवडावे आणि खराब फंडमधून कधी बाहेर पडावे? जाणून घ्या
x

Tata Mutual Funds | जिथे टाटा तिथे होत नाही घाटा, टाटा म्युचुअल फंडातून करा मजबूत कमाई, पैसा वेगाने वाढवा

Tata Mutual fund

Tata Mutual Funds | मनी मार्केट म्युचुअल फंड हा म्युच्युअल फंडाचा असा एक प्रकार आहे जो अल्पकालीन, उच्च तरल, आणि जास्त परतावा देणाऱ्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करतो. याच्या गुंतवणुकीची उदाहरणे रोख, रोख-समतुल्य सिक्युरिटीज आणि उच्च-क्रेडिट-रेटिंग कर्ज-आधारित इंवेस्टमेंट सिक्युरिटीज आहेत. जोखीम कमी करून गुंतवणूकदारांना उच्च लिक्विडीटी देण्यासाठी अश्या मनी मार्केट म्युचुअल फंडांची रचना करण्यात आली होती. लिक्विडीटी म्हणजे गरजेच्या वेळी गुंतवणूकदारांना हवे तेव्हा लवकर पैसे परत मिळू शकतात. मनी मार्केट म्युच्युअल फंड हे मनी मार्केट फंडाचेच दुसरे नाव आहे. येथे आम्ही तुमच्यासोबत टाटा म्युच्युअल फंडाच्या मनी मार्केट फंडाची चर्चा करणार आहोत. अश्या फंडानी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे.

टाटा मनी मार्केट फंड/डायरेक्ट ग्रोथ म्युचुअल फंड :
नावाप्रमाणेच हा प्रसिद्ध टाटा म्युच्युअल फंड हाऊसचा एक मनी मार्केट फंड आहे. या मनी मार्केट फंडाच्या डायरेक्ट प्लॅन-ग्रोथ स्कीम अंतर्गत अॅसेट अंडर मॅनेजमेंट प्रमाण 7,795.18 कोटी रुपये होते. त्याच्या खर्चाचे प्रमाण 0.25 टक्के इतके होते, जे त्याच्या श्रेणीतील इतर फंडच्या तुलनेत सरासरीपेक्षा कमी आहे. या फंडाचे नुकतेच घोषित केलेले नेट अॅसेट व्हॅल्यू किंवा निव्वळ मालमत्ता मूल्य 3823.85 कोटी रुपये आहे.

3 स्टार रेटिंग :
हा मनी मार्केट फंड त्याच्या श्रेणीतील एक ओपन-एंडेड मध्यम आकाराच्या भांडवल असलेला फंड आहे. फंडाचा बेंचमार्क “क्रिसिल मनी मार्केट इंडेक्स फंड” आहे. हा कमी ते मध्यम जोखमीचा मनी मार्केट फंड म्हणून ओळखला जातो. रेटिंग एजन्सी “क्रिसिलने” या योजनेला 3 स्टार रेटिंग दिले आहे. यासारख्या इतर गुंतवणुकीमध्ये त्याची कामगिरी जेमतेम सरासरी राहिली आहे. जे गुंतवणूकदार बँक खाती किंवा मुदत ठेवींमध्ये अल्प मुदतीच्या पण जास्त परताव्याच्या गुंतवणुकीचे पर्याय शोधत असतील ते गुंतवणुकीसाठी हा मनी मार्केट फंड निवडू शकतात. गुंतवणुकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात ठेवावे की, बाजाराच्या अस्थिर परिस्थितीत किंवा घसरत्या बाजारातील तोटा नियंत्रित करण्याची त्याची क्षमता देखील सरासरी आहे.

परतावा कामगिरी :

एकरकमी गुंतवणुकीवर या म्युचुअल फंडाचा वार्षिक परिपूर्ण परतावा :
* 1 वर्षात 4.32 टक्के,
* 2 वर्षात 10.35 टक्के,
* 3 वर्षात 18.64 टक्के,
* 5 वर्षात 27.52 टक्के

स्थापनेपासून (जानेवारी 2013) 80.26 टक्के आहे. त्याच वेळी, फंडाचा मिळालेला वार्षिक परतावा दर 4.23 टक्के, 5.05 टक्के, 5.85 टक्के, 4.98टक्के आणि 6.58 टक्के होता.

SIP परतावा कामगिरी :

फंडाच्या SIP परताव्याबद्दल माहिती घेतली तर, फंडाचा वार्षिक परिपूर्ण परतावा :
1 वर्षात 2.27 टक्के,
2 वर्षात 4.61 टक्के,
3 वर्षात 7.92 टक्के
5 वर्षांत 13.33 टक्के

फंडाचा वार्षिक परतावा अनुक्रमे 4.25 टक्के, 4.41 टक्के, 5.02 टक्के आणि 4.95 टक्के राहिला होता.

फंडाचा पोर्टफोलिओ :
फंडाचे कर्ज देणीतील एक्सपोजर 79.16 टक्के नोंदवले गेले आहे. गुंतवणुकीच्या वाट्यापैकी 17.3 टक्के सरकारी रोख्यांमध्ये, आणि 61.86 टक्के अत्यंत कमी जोखमी असलेल्या रोख्यांमध्ये गुंतवले गेले आहेत. फंडाचा क्रेडिट रेकॉर्ड उत्कृष्ट आहे, जे असे दर्शवते की त्याने उच्च आर्थिक दर्जाच्या ग्राहकांना कर्ज दिले आहे. कारण या श्रेणीतील बहुतेक फंड मजबूत परतफेड क्षमता असलेल्या कर्जदारांनाच कर्ज देतात. या श्रेणीतील इतर फंडांच्या तुलनेत या मनी मार्केट फंडामध्ये डिफॉल्ट होण्याचा धोका जास्त असतो. या मनी मार्केट फंडचे काही प्रमुख होल्डिंग्स Tata Teleservices Ltd, Barclays Investments and Loans Ltd, IDFC Bank Ltd, Axis Bank Ltd. अश्या दिग्गज कंपनी आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Mutual fund money market fund return on investment on 11 August 2022

 

हॅशटॅग्स

#Tata Mutual Fund(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x