
Tata Mutual Fund | टाटा म्युच्युअल फंडाची एक योजना अशी आहे की, ज्यांनी गेल्या ३० वर्षांपासून एसआयपीच्या माध्यमातून दरमहा ३००० रुपयांची गुंतवणूक केली ते आता साडेतीन कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे मालक झाले आहेत. त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक 11 लाख रुपये सुद्धा नाही. पण सुमारे ३ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.
दरम्यान, यामध्ये केलेली एकरकमी गुंतवणूकही ३७ पटीने वाढली आहे. टाटा मिडकॅप ग्रोथ फंड असे या योजनेचे नाव आहे. टाटा म्युच्युअल फंड ही देशातील सर्वात जुन्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक असून, त्याच्या काही योजना गुंतवणूकदारांसाठी कोट्यधीश योजना ठरल्या आहेत.
Tata Midcap Growth Fund
लॉन्च डेट: 1 जुलाई, 1994
कालावधी: अंदाजे 31 वर्षे
फंडाने एसआयपी वर किती परतावा दिला
* एसआयपीचा 30 वर्षांचा वार्षिक परतावा : 17.46%
* मासिक एसआयपी रक्कम : 3000 रुपये
* 30 वर्षात एकूण गुंतवणूक : 10,80,000 रुपये
* 30 वर्षांनंतर एसआयपीचे मूल्य : 2,79,21,232 रुपये
फंडाने एकरकमी गुंतवणुकीवर किती परतावा दिला
* लॉन्च डेट: 1 जुलाई, 1994
* लाँचिंगपासून परतावा : वार्षिक 12.83 टक्के
* 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य : 40,24,330 रुपये (40 लाख रुपये)