27 July 2024 10:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

Tata Mutual Funds | टाटा म्युचुअल फंडाच्या या जबरदस्त परतावा देणाऱ्या 3 योजना लक्षात ठेवा, 5 वर्षात पैसा चौपटीने वाढला

Tata mutual funds

Tata Mutual Funds | आज आपण अशा 3 योजना पाहणार आहोत, ज्यात गेल्या 5 वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना दुप्पट, तिप्पट नाही तर चारपट इतका जबरदस्त परतावा मिळाला आहे. टाटा म्युच्युअल फंड ही टाटा समूहाची कंपनी आहे, टाटा समूह भारतातील नाही तर जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक समूहांपैकी एक आहे. टाटा म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक म्युचुअल फंड योजना आहेत ज्यात इक्विटी फंड तसेच डेट फंड यांचा समावेश होतो. टाटा म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांबद्दल जाणून घेतल्यास असे कळेल की, गुंतवणूकदारांना त्यामध्ये जबरदस्त परतावा मिळत आहे.

या म्युचुअल फंडात गुंतवणूक करणाऱ्याची संपत्ती फक्त 5 वर्षात 4 पट वाढली. या योजनांमध्ये, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP द्वारे गुंतवणुक करण्यात प्रचंड वाढ झाली आहे. येथे आम्ही अशा 3 योजनाची माहिती आपल्याला सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना मागील 5 वर्षांत दुप्पट, तिप्पट नाही तर चार पट पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. या योजनांची खास गोष्ट म्हणजे कोणताही लहान गुंतवणूकदार फक्त 150 रुपयांच्या SIP सह गुंतवणूक सुरू करू शकतो.

टाटा डिजिटल इंडिया फंड :
टाटा डिजिटल इंडिया फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मागील 5 वर्षात 37.22 टक्के वार्षिक इतका भरघोस परतावा मिळाला आहे. या योजनेत 5 वर्षांपूर्वी केलेली 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक आज 4.86 लाख रुपये झाली आहे. त्याच वेळी, 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणुकीचे मूल्य 17.05 लाख रुपये झाले आहे. या म्युचुअल फंड योजनेत आपण 150 रुपये च्या मासिक SIP सह गुंतवणूक सुरू करू शकतो. फंडाची एकूण मालमत्ता 3,842 कोटी रुपये असून त्यांच्या खर्चाचे प्रमाण 0.43 टक्के आहे. ही योजना 28 डिसेंबर 2015 रोजी सुरू करण्यात आली होती.

टाटा मिडकॅप ग्रोथ फंड :
टाटा मिडकॅप ग्रोथ फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मागील 5 वर्षात 20.96 टक्के इतका जबरदस्त वार्षिक परतावा मिळाला आहे. या योजनेत 5 वर्षांपूर्वी केलेली 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक आज 2.59 लाख रुपये झाली आहे. त्याच वेळी, 10,000 रुपये मासिक गुंतवलेले SIP चे मूल्य आज 10.97 लाख रुपये झाले आहे. या योजनेत तुम्ही फक्त 150 रुपयेच्या मासिक SIP सह गुंतवणूक सुरू करू शकता. या फंडाची एकूण मालमत्ता 1,460 कोटी रुपये असून त्यांच्या खर्चाचे प्रमाण 1.06 टक्के आहे. या योजनेची सुरुवात १ जानेवारी २०१३ रोजी करण्यात आली होती.

टाटा इंडिया कंझ्युमर फंड :
टाटा इंडिया कंझ्युमर फंड मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मागील 5 वर्षात 23.59 टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. या फंड योजनेत ज्या लोकांनी 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली होती त्यांचे मूल्य आज 2.88 लाख रुपये झाले आहे. त्याच वेळी, ज्यांनी 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक केली त्याचे मूल्य 10 लाख रुपयांवर गेले आहे. या योजनेत आपण फक्त 150 रुपये मासिक SIP सह गुंतवणूक सुरू करू शकता. या फंड योजनेची एकूण मालमत्ता 1,344 कोटी रुपये असून खर्चाचे प्रमाण 0.88 टक्के आहे. या योजनेची सुरुवात 28 डिसेंबर 2015 रोजी झाली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Mutual Funds giving four times return in short term on 30 July 2022.

हॅशटॅग्स

#Investment(85)#Tata Mutual Fund(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x