25 March 2023 11:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme Balance | खुशखबर! PPF मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांच्या खात्यात 31 मार्चला पैसे ट्रान्सफर होणार, अधिक जाणून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा आता निरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी भारतात परतून स्वतःला OBC नेते घोषित करतील, भाजप त्यांचं स्वागत करेल - रवीश कुमार Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या SBI Bank mPassbook | पासबुक अपडेटसाठी आता SBI बँकेत जाण्याची गरज नाही, असं करा सहज ऑनलाईन अपडेट CIBIL Score | कर्जाचा EMI थकवल्याने डिफॉल्ट झाल्यावरही सिबिल स्कोर कसा सुधारू शकता पहा SIP Calculator | अशी SIP करा म्हणजे 4 वर्षांनंतर 15 लाख रुपयांची कार खरेदी करू शकाल, संपूर्ण गणित पहा
x

LIC Mutual Fund | LIC शेअर्सने पैसे बुडवले, पण LIC म्युच्युअल फंडाच्या या योजना 100% पर्यंत परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा

LIC Mutual Fund

LIC Mutual Fund | LIC ही भारतील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी असून शेअर बाजारातील सर्वात मोठी गुंतवणूकदारही आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी म्युच्युअल फंड योजना देखील राबवते. एलआयसी म्युच्युअल फंडाच्या टॉप योजनांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की या योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे.

म्युच्युअल फंडात नेहमी दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास जास्त फायदा होतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी LIC म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 योजनांची माहिती घेऊन आलो आहोत, ज्यांनी मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे.

LIC S&P BSE सेन्सेक्स म्युच्युअल फंड :
LIC S&P BSE सेन्सेक्स म्युच्युअल फंड योजनेने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 13.69 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने अवघ्या 5 वर्षात लोकांच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.90 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

LIC निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड :
LIC निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 12.85 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने अवघ्या 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.83 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे.

एलआयसी लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंड :
LIC लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंड योजनेने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 12.82 टक्के दराने परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना अवघ्या 5 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.82 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे.

एलआयसी लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजना :
LIC लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजनेने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 12.04 टक्के दराने नफा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने अवघ्या 5 वर्षांत लोकांचे 1 लाख रुपये वाढून त्यांना 1.77 लाख रुपयांचा परतावा दिला आहे.

एलआयसी इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड :
LIC इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना अवघ्या 5 वर्षांत सरासरी 11.14 टक्के रिटर्न्स दिले आहेत. या म्युचुअल फंड योजनेने गेल्या 5 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.70 लाख रुपये रिटर्न्स दिले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| LIC Mutual Fund Scheme for investment and Earning huge returns on 29 November 2022.

हॅशटॅग्स

#LIC Mutual Fund(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x