Numerology Horoscope | 02 ऑक्टोबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या
Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.
मूलांक १-
आजचा आपला दिवस कर्तृत्वाने भरलेला असू शकतो. क्षेत्रात आणि व्यवसायात नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतील. वातावरण आपणास अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. आधीच अडकलेली कामे मार्गी लागतील. महत्त्वाच्या बाबींचा विचार करून निर्णय घ्या. विरोधकांवर विजय मिळेल. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.
मूलांक 2-
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील परंतु व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. क्षेत्रात नव्या योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. कुटुंबासोबत सहलीला जाण्याची योजना आखू शकता. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
मूलांक 3-
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. तुम्ही सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असाल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल. जुन्या काळापासून अडकलेली कामे मार्गी लागतील. परिवाराचे सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. व्यवसायात लाभ होईल. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा.
मूलांक 4-
आज कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण तुमच्यासाठी कमी अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. कोणालाही कर्ज देणे टाळा. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायात नुकसान होऊ शकते. परिश्रमाने केलेल्या कामाचे शुभ फळ मिळेल. परिवाराचे सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांची भेट संभवते. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.
मूलांक 5-
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटता येईल. कार्यक्षेत्रात व व्यवसायात नव्या जबाबदाऱ्या सोपविता येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आपली कार्यक्षमता वाढेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण व्हाल. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपले आरोग्य सामान्य राहील.
मूलांक 6-
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत विकसित करता येतील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. घर-कुटुंबाशी संबंधित कामांमध्ये रुची वाढेल. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपले आरोग्य सामान्य राहील.
मूलांक ७-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. विरोधकांपासून सावध राहा. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. आपण व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना आखू शकता. कुटुंबात वाद होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.
मूलांक ८-
आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. कार्यक्षेत्रात व व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील. सर्जनशील कार्यात आपली रुची वाढेल. नव्या कल्पना मनात येतील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आपली कार्यक्षमता वाढेल. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपले आरोग्य सामान्य राहील. सामाजिक कार्यात सक्रियता वाढू शकेल.
मूलांक ९-
आजचा तुमचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांच्या मदतीने कठीण कामेही केली जातील. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार . व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आपण व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना आखू शकता. इगो सेन्सपासून दूर राहा. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. घशाचे आजार त्रास देऊ शकतात
News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 02 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा?
- Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
- Numerology Horoscope | 15 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल