23 September 2021 4:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता

मुंबई : मुंबई मधील वार्ड क्रमांक. ८१ मधील भाजपचे विद्यमान नगरसेवक मुरजी पटेल (काका) यांच्याकडे अंधेरी (पूर्व) विधानसभा क्र . १६६ साठी भाजपचे मोठे दावेदार म्हणून पहिले जात आहे. सध्या हा विधानसभा मतदार संघ जरी शिवसेनेच्या ताब्यात असला तरी भाजपचे मुरजी पटेल यांना स्थानिकांचा वाढता प्रतिसाद बघता येत्या विधानसभेत अंधेरी (पूर्व) विधानसभा क्र . १६६ मध्ये वेगळी राजकीय समीकरण पहावयास मिळू शकतात अशीच चिन्हं आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मुरजी पटेल हे मुंबई मधील वार्ड क्रमांक. ८१ मधील भाजपचे विद्यमान नगरसेवक असून त्यांच्या पत्नी वॉर्ड क्र. ७४ मधून नगरसेविका आहेत. या विधानसभा मतदार संघात त्यांच्या ‘जीवनज्योत प्रतिष्ठान’ मार्फत अनेक समाजउपयोगी कामाचा धडाका चालू आहे. विशेष करून स्थानिक तरुणांचा आणि महिलांचा सहभाग हा बरच काही सांगून जातो. मुरजी पटेल यांच्या ‘जीवनज्योत प्रतिष्ठान’ मार्फत मतदारसंघातील गरजूंना अनेक प्रकारच्या आरोग्यासंबंधित सुविधा मोफत पुरविल्या जातात.

स्त्रियांच्या समाजातील चांगल्या कामासाठीच महत्व ओळखून मुरजी पटेल यांनी मतदारसंघातील महिलांसाठी बचतगटाचे जाळे विणले असून, त्या महिला बचत गटांना मदत व्हावी म्हणून ‘जीवनज्योत प्रतिष्ठान’ मार्फत निरनिराळे उपक्रम राबविले जातात आहेत. केवळ एका समाजापुरताच मर्यादित विचार न करता मुरजी पटेल हे सर्वच धर्मीयांसाठी सारख्याच आपले पणाने आणि आपुलकीने मदत करतात असे तिथले स्थानिकच प्रामाणिकपणे सांगतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि तरुणांना ११६ बसने आंगणेवाडी जत्रा तसेच शिर्डी साईदर्शनला स्वखर्चाने पाठविले होते.

मुरजी पटेल यांनी आयोजित केलेल्या अंधेरी महोत्सवानंतर ते अंधेरी (पूर्व) विधानसभा क्र . १६६ मधील घराघरात पोहोचले. अंधेरी महोत्सवातील स्थानिक तरुणांचा सहभाग हा सर्वानांच थक्क करणारा होता. मतदार संघातील तरुण – तरुणीच्या कला गुणांना दिशा मिळावी म्हणून ‘जीवनज्योत प्रतिष्ठान’ मार्फत या अंधेरी महोत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गायन स्पर्धा, लहान मुला-मुलींसाठी चित्रकला आणि हस्तकला स्पर्धा तसेच तरुणांसाठी निरनिराळ्या स्पर्धांचे आयोजन असे अनेक उपक्रम राबविले जातात.

त्यांच्या मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या कामाचे बोलायचे झाल्यास रस्त्यांची कामे, सुशोभीकरण, सुलभ सौचालाय, पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी गटारांची कामे, रस्त्यांवरील दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे, मोफत वायफाय या त्यांच्या मतदारसंघातील कामासंबंधित जमेच्या बाजू आहेत. गरीब आणि गरजू मुला-मुलींना शिक्षण मिळावे म्हणून ‘जीवनज्योत प्रतिष्ठान’ मार्फत त्या गरजूंच्या शिक्षणाचा खर्च तसेच वैद्यकीय मदत मोफत पुरविली जाते.

मतदार संघात कोणत्याही वेळी मदतीला धावून येणारा माणूस म्हणून मुरजी पटेल (काका) हे सर्वांना परिचित आहेत. सध्या ही जागा शिवसेनेच्या ताब्यात असली तरी मुरजी पटेल यांच्या ‘जीवनज्योत प्रतिष्ठान’ मार्फत होणाऱ्या कामाचा धडाका, तगडा जण संपर्क आणि स्थानिक जनतेचा वाढता पाठिंबा पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत अंधेरी (पूर्व) विधानसभा क्र . १६६ मधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी आणि आमदार सुद्धा त्यांच्या कामाचं कौतुक करताना दिसतात. विरोधकांशी शाब्दिक वाद विवादात न जाता, स्वतःच्या प्रामाणिक लोकउपयोगी कामातूनच त्यांनी सर्व विरोधकांची बोलती बंद केली आहे.

हॅशटॅग्स

#Murji Patel(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x