14 April 2024 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास बचत योजना, मिळेल 7.70 टक्के व्याज आणि मोठा परतावा मिळवा Force Gurkha | फोर्सची गोरखा SUV लाँचिंगसाठी सज्ज, थेट जिम्नी, थार सारख्या वाहनांशी स्पर्धा करणार, फीचर्स जाणून घ्या SBI Amrit Kalash Scheme | SBI बँकेची खास FD योजना, मिळेल वार्षिक 7.60 टक्के व्याज, बचतीसाठी बँकेत लाईन KTM RC 200 | लोकप्रिय KTM मोटरसायकलवर 5 वर्षांची वॉरंटी, रोड साइड असिस्टन्स सर्व्हिस फ्री Mangal Rashi Parivartan | मंगळ राशीपरिवर्तनाने 'या' 4 राशींचे भाग्य चमकणार, तुमची नशीबवान राशी आहे का? SBI Mutual Fund | एसबीआयची प्रसिद्ध म्युच्युअल फंड योजना, दरमहा 5000 रुपयांची SIP देईल 49 लाख रुपये Royal Enfield | रॉयल एनफिल्ड प्रेमींसाठी खुशखबर! कंपनी 'या' 3 नवीन बाईक्स लाँच करणार, फीचर्स डिटेल्स जाणून घ्या
x

छत्तीसगढ: भरोसा नाही बाबा भाजपवर? काँग्रेस उमेदवारांचा EVM मशीनभोवती पहारा

कोंडागाव : ईव्हीएम मशीनमधील गडबडींची धास्ती छत्तीसगडच्या काँग्रेस उमेदवारांनी घेतल्याचे पहायला मिळत आहे. मागील निवडणुकीत ईव्हीएम’मध्ये भाजपने अनेक चुकीच्या गोष्टी संगनमताने केल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आले आहेत. अनेक मतदारसंघात उमेदवारांना स्वतःचे मत सुद्धा न मिळाल्याने अनेकांनी शंका व्यक्त केली होती. त्यात धमतारी येथे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉन्गरूम’मध्ये एका अनोळखी व्यक्तीला तहसीलदाराचं सोबत घेऊन गेल्याने काँग्रेसने रान उठवले होते. त्यानंतर सदर तहसीलदारांना निवडणूक आयोगाने सस्पेंड केले आहे.

परंतु, काँग्रेसच्या छत्तीसगडमधील उमेदवारांनी याची खूपच धास्ती घेतल्याचे पहायला मिळत आहे. कारण, छत्तीसगड मध्ये विधानसभेचं मतदान पूर्ण झालं असलं तरी, काँग्रेसचे उमेदवार ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत त्या ठिकाणी तंबू ठोकून पोलिसांसोबत पाहारा देत असल्याचं समजतं. सादर उमेदवार कोणताही धोका पत्करण्यास तयार नसून आम्हाला भाजपवर जराही विश्वास नाही असं त्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, ही बातमी छत्तीसगडमधील केशकाल आणि कोंडागाव या विधानसभा क्षेत्रातील आहेत असं वृत्त आहे. त्यामुळे ईव्हीएम’च्या अफरातफरीची काँग्रेस उमेदवारांनी किती डस्टी घेतली आहे ते सिद्ध होत आहे. निकाल लागे पर्यंत ते इथून हलणार नसल्याचे समजते.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x