19 January 2022 1:38 AM
अँप डाउनलोड

राज्याचे वनमंत्री शिकारी माफियासोबत पैसे कमवत आहेत: संजय निरुपम

मुंबई : कांग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी अवनी वाघिणीच्या शिकारीनंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वनमंत्री सुधीर मुंगंटीवार हे शिकारी माफियांसोबत पैसे कमवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

अवनी वाघीण हत्या प्रकरणाचं राजकारण दिल्ली पासून राज्यभर पसरलं असून समाजातील सर्वच थरातून या घटनेचा निषेध होताना दिसत आहे. अवनी वाघिणीला ठार केल्याप्रकरणी फडणवीस सरकारवर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल चढवला जात आहेत. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना संजय निरुपम यांनी सांगितलं की, सुधीर मुनगंटीवार राज्याचे वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याची संख्या प्रचंड वाढली आहे तसेच यावरून निरुपम यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.

हॅशटॅग्स

#SanjayNirupam(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x