23 September 2021 2:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

बारामती | उपमुख्यमंत्री अजित पवारांची रिक्षातून अनोखी सफर

DCM Ajit Pawar

बारामती, २८ ऑगस्ट | पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच आपल्या रोखठोक आणि बेधडक स्वभावामुळे चर्चेत असतात. आज तर अजित पावर यांनी चक्क रिक्षाची ट्रायल घेतली. अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

उपमुख्यमंत्री अजित पवारांची रिक्षातून अनोखी सफर  – DCM Ajit Pawar auto rickshaw driving in Baramati :

बारामती औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या पियाजियो कंपनीने इलेक्ट्रिक रिक्षा ची निर्मिती केली आहे. या रिक्षाची पाहणी करताना पवारांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती घेतली त्यानंतर मात्र अजित पवार थेट रिक्षात बसले आणि परिसरातून रिक्षाची ट्रायल घेतली.गेल्याच आठवड्यात अजित पवारांनी एका चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेतला होता. त्यापूर्वी एका पान टपरी वर त्यांनी पान देखील खाल्ले होते. त्यामुळे आता अजित पवार यांची चर्चा सुरू झाली.

भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्राचे भूमीपूजन:
भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रातील तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ नवीन अत्याधुनिक प्रणाली विकसित करुन भूजल विकास व व्यवस्थापन आराखडा तयार करुन तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवतील. सामान्य जनता आणि शासन यांच्यामधील दुवा बनतील, अशी खात्री अजित पवार यांनी व्यक्त केली.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्राचे भूमीपूजन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार व्हीसीद्वारे उपस्थित होते.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (व्हीसीद्वारे), जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थितीत होत्या. तर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: DCM Ajit Pawar auto rickshaw driving in Baramati.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x