18 May 2022 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PNB MetLife Dental Health Insurance | आता डेंटल केअर इन्शुरन्स प्लॅन देखील घेता येणार | फायदे जाणून घ्या Ethos IPO | आजपासून इथॉस आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी | तपशील जाणून घ्या Hot Stocks | या 3 शेअर्सनी गुंतवणूकदारांना केवळ 3 दिवसात मजबूत परतावा दिला | स्टॉकबद्दल जाणून घ्या Multibagger Stock | या 15 रुपयाच्या शेअरने १ लाखाच्या गुंतवणुकीचे 15 लाख रुपये केले | स्टॉकबद्दल जाणून घ्या Stocks To Buy Today | या 5 शेअर्समधून 1 आठवड्यात कमाईची मोठी संधी | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा Fuel Prices | मोदी सरकार जनतेला अजून धक्का देण्याच्या तयारीत | पेट्रोल-डिझेलच्या दरात 4 रुपयांनी वाढ होणार
x

भयंकर! भाजपच्या झेंड्याखाली 'विंग कमांडर अभिनंदन' यांचा फोटोवापरून निवडणुकीचा प्रचार

Pakistan, IAF, PAF, Pulawama Attack

नवी दिल्ली: भारतीय वायूदलाने २६ फेब्रुवारी मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ला करून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान, पाकिस्तानी लढाऊ विमानांवर हल्ल्या करताना विंग कमांडर अभिनंदन यांनी महत्वाची जवाबदारी आणि बहाद्दुरी दाखवली होती. तसेच पाकिस्तानच्या प्रतिऊत्तरात त्याचे मिग २१ लढाऊ विमान कोसळेल, परंतु ते पॅराशूटच्या साहाय्याने खाली आले मात्र दुर्दैवाने पाकिस्तानच्या हद्दीत पडले आणि त्यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतलं.

परिस्थिती चिघळलेली असताना आणि आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला. विंग कमांडर अभिनंदन देशात वाघा सीमेवरून सुखरूप परतले, मात्र त्यानंतर त्यांच्या शौर्याचा सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या मतपेटीसाठी वापर सुरु केल्याचे समोर येत आहे.

भाजपचे नेते थेट विंग कमांडर अभिनंदन यांचे फोटो गाड्यांवर लावून आणि भाजपचे झेंडे त्यावर सजवून मोदी अगेनचे नारे देत आहेत. विशेष म्हणजे त्यावरील शोषवाक्यात देखील विंग कमांडर अभिनंदन यांचा वापर सुरु केला आहे. त्यावर लिहिण्यात आलं आहे की “अभिनंदन तेरा वंदन है. मोदी है तो मुमकिन है. नमो अगेन. त्यामुळे भाजप आगामी निवडणुका लष्कराच्या जवानांच्या नावाचा वापर करून लढवणार हे निश्चित आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x