27 May 2024 12:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 27 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 27 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budhaditya Rajyog 2024 | बुधादित्य राजयोग, 3 राशींचे नशीब चमकणार, पैसा संपत्तीसाठी अत्यंत शुभं काळ ठरणार SBI Mutual Fund | नोकरदारांनो! 'या' 5 म्युच्युअल फंड योजनेतील बचत 1 कोटी पर्यंत परतावा देईल, नोट करा Railway Confirm Ticket | कन्फर्म रेल्वे तिकीट दुसऱ्याची आणि प्रवास तुमचा, नेमकं काय होईल? काय करावं लक्षात ठेवा Bank Account Alert | पगारदारांनो! पैशासंबंधित 'या' 5 गोष्टी करत असाल तर सावधान, मोठा आर्थिक फटका बसेल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव 2186 रुपयांनी धडाम झाला, पटापट शहरातील नवे दर तपासून घ्या
x

बाळासाहेबांचे स्मारक उभारता अाले नाही, पहिल्यांदा अापल्या वडीलांचं स्मारक बांधावं

पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर राम मंदिरावरून बोचरी टीका केली आहे. मुंबईची सत्ता शिवसेनेच्या हातात असताना अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे स्मारक उभारता अाले नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांनी पहिल्यांदा अापल्या जन्मदात्या वडीलांचं स्मारक बांधावं. त्यानंतर जनतेला त्यांच्याबद्दल खात्री पटेल. लाेकांना राम मंदिराच्या नावाने भावनिक आवाहन करून राजकरण करण्याचा खेळ सुरु आहे असं अजित पवार म्हणाले. शिवसेना पक्ष प्रमुखांमध्ये जर धमक असेल तर त्यांनी अयाेध्येला राम मंदिर बांधण्याची तारीख जाहीर करावी, असे खुलं अाव्हानच अजित पवारांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

विविध मागण्यांसाठी कॅम्पातील मेमाेरिअल हाॅलपासून विभागीय अायुक्त कार्यालयापर्यंत राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे आज पुण्यात माेर्चा काढण्यात अाला असता उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. अजित पवार म्हणाले, शिवसेनेकडून मंदिराचं राजकारण निवडणूका डाेळ्यासमाेर ठेवूनच केलं जात आहे. जर यांना राम मंदिर करायचं असतं तर ४ वर्ष हाेऊन गेले भाजप-शिवसेनेच्या युती सरकारला सत्तेत येऊन तर यांना ४ वर्ष राम मंदिर बांधण्यापासून काेणी अडवलं होतं का? असा खडा सवाल उपस्थित केला. सत्ताकाळाच्या ४ वर्षात त्यांना हवं ते करुण घेणं शक्य होते. परंतु, केवळ निवडणूकीच्या तोंडावर भावनिक मुद्दे काढून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत असं ते म्हणाले.

शिवसेना पक्ष नेहमी दुटप्पी भूमिका घेते. शिवसेना म्हणते कर्जमाफी मध्ये भ्रष्टाचार झाला. आणि मग जर भ्रष्टाचार झाला तर शिवसेनेचे मंत्री काय करत हाेते. त्यांनी ताे उघड करून लोकांसमोर का अाणला नाही. अाज सामान्य जनता प्रचंड त्रासलेली अाहे. त्यामुळे वाढत्या महागाईला भाजप साेबत शिवसेना सुद्धा जबाबदार अाहे. युती सरकारच्या सगळ्या अपयशांमध्ये शिवसेना सुद्धा तितकीच वाटेकरी अाहे. असेही पवार यावेळी म्हणाले. राज्य सरकारने ताबडतोब दुष्कार जाहीर करावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत करावी आणि भारनियमन रद्द करावे, वाढती बेराेजगारी दूर करण्यासाठी तात्काळ पाऊले उचलावीत, अशा सर्व मागण्यांसाठी पुण्यात विशाल आयोजित केला होता.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x