4 August 2020 1:13 PM
अँप डाउनलोड

खडसे'साहेब ज्येष्ठ आहेत, त्यांना पंतप्रधानही व्हायला आवडेल

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल विधान केलं होत की, पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. परंतु, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत आहे. एकनाथ खडसेंच्या त्या प्रतिक्रियेला गिरीश महाजन यांनी उत्तर दिल आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

खडसेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले की, ‘खडसेसाहेब ज्येष्ठ आहेत. त्यांना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानही व्हायला आवडेल. मात्र, पक्षाला तसं वाटायला पाहिजे. पक्षाला जे वाटत तेच महत्वाचे आहे’, अशा शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या समाचार घेत त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

आज नियोजन बैठकीसाठी महाजन जळगाव येथे आले असता त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिल. महाजन यांनी बोलताना खडसेंना चांगलाच राजकीय चिमटा काढला आहे. त्यामुळे आगामी काळात जळगाव मधील राजकारण खडसे विरुद्ध महाजन असं पेटण्याची शक्यता आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

BJP(416)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x