31 March 2023 11:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
April Month Horoscope | एप्रिल महिन्यात 12 राशींमध्ये कोणाला नशिबाची साथ? कोणासाठी मोठी संधी? तुमचं मासिक राशीभविष्य वाचा Odysse Vader e-Bike | ओडिसे वडर ई-बाइक लॉन्च, फुल चार्ज वर 125 किमी रेंज, 999 रुपये टोकन देऊन बुक करा SRF Share Price | या शेअरने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1.20 कोटी रुपये परतावा दिला, आता नवी टार्गेट प्राईस, खरेदी करावा का? Multibagger Stocks | पैशाचा छापखाना! या 8 मल्टिबॅगर शेअर्सनी 8375 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, फक्त 1 वर्षात कमाई, खरेदी करणार? Numerology Horoscope | 01 एप्रिल, तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जोरदार कोसळले, पटापट आजचे तुमच्या शहरातील दर तपासून घ्या NA Plot Deal | 'NA प्लॉट' खरेदी करणार आहात? बिगरशेती भूखंड खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा...
x

शिवसेनेवर प्रचंड संतापलेला मराठी माणूस राज ठाकरेंसोबत एकवटू शकतो: सविस्तर

Udhav Thackeray, Shivsena, BJP Alliance, Raj Thackeray, MNS

मुंबई : काल भाजप शिवसेनेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली आणि त्यानंतर मराठी जनमानसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांच्या बद्दल प्रचंड संतापाची भावना निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील साडेचार वर्षांपासून स्वबळ आणि स्वाभिमानाच्या बाता मारणारे उद्धव ठाकरे किती ठाम मताचे आहेत हेच यातून अधोरेखित झालं आहे. केवळ आगामी निवडणुकीत स्वतःची जास्त जागांची सुप्त इच्छा पूर्ण कारण्यासाठीच त्यांनी सामान्य मराठी मतदाराला अक्षरशः मूर्ख बनवलं असंच म्हणावं लागेल. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेला मराठी मताच्या जबर फटका बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. सत्ताकाळात डझनभर मंत्र्यांनी विकासाची काहीच कामं केली नाहीत म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक हिंदुत्व आणि राम मंदिर असे भावनिक मुद्दे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने बाहेर काढले. परंतु, शिवसैनिकांकडून स्वबळाची शपथ घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी स्वतःच शपथ मोडून शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्याचा देखील त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आधीच राज्याची राजधानी मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या ठाणे, मीरा-भायंदर शहरांमध्ये मराठी माणूसच अल्पसंख्यांक होण्याच्या दिशेने कूच करत आहे. हिंदी भाषिकांची संख्या इतकी प्रचंड वाढलेली दिसत आहे, की इथली राजकीय गणित देखील मराठी माणसाच्या मतांवर अवलंबून राहिलेली नाही. नेमकं तेच राजकीय वास्तव स्वीकारून मराठी माणसाची शिवसेना असा बोंबला करत खुलेआम उत्तर भारतीयांच्या सन्मानासाठी मुंबई-ठाणे सारख्या शहरात सज्ज झाली आहे. मुबईकर आणि हिंदुत्वाच्या आडून मुंबई-ठाण्यातल्या मराठी माणसाला शिवसेनेने कधी मूर्ख बनवलं याचा पत्ता त्याला स्वतःला सुद्धा अजून लागलेला नाही.

राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत वेगवेगळया भाषा बोलल्या जात असल्या तरी मराठी भाषा ही मुंबईची मुख्य ओळख आहे. मात्र मागच्या अनेक वर्षात स्थलांतरामुळे मुंबईच्या लोकसंख्येमध्ये प्रचंड भाषिक बदल होत आहेत. त्यामुळे मराठी मुंबईची हळूहळू हिंदी भाषिकांचे शहर अशी ओळख बनण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय दृष्ट्या विखुरलेला मराठी समाज हीच मराठी माणसाची ओळख प्रत्येक राजकीय पक्षाने केल्याने त्याला आज मनसे वगळता कोणीही गृहीत धरताना दिसत नाही. परंतु मराठी माणसाच्या वृत्तीने उद्या त्यांना देखील बदलण्यास भाग पाडल्यास नवल वाटायला नको.

मातृभाषे संदर्भातला २०११ सालचा जनगणनेचा जो अहवाल आहे त्यानुसार मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. २००१ साली मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या २५.८८ लाख होती. २०११ मध्ये हेच प्रमाण ३५.९८ लाख झाले. त्याचवेळी मराठी मातृभाषिकांच्या संख्येत २.६४ टक्के घट झाली. २००१ साली ४५.२३ लाख लोकांनी मराठी मातृभाषा असल्याचे सांगितले होते. २०११ मध्ये हेच प्रमाण ४४.०४ लाख झाले.

मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाणे आणि रायगडमध्येही लोकसंख्येतील हे बदल दिसून येतात. ठाणे, रायगडमध्ये हिंदी भाषिकांच्या संख्येत तब्बल ८० टक्के वाढ झाली आहे. बदलत्या लोकसंख्येमुळे सरकारच्या फक्त नियोजन आणि धोरणांमध्येच बदल होत नाहीय तर या भागात नवीन राजकारणही आकाराला येत आहे. नुकत्याच नव्या मुंबईच्या विकास आराखड्यावर लक्ष दिल्यास कोळी समाज सुद्धा लुप्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. महाराष्ट्राच्या अन्य भागातून मुंबईला होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण १९६१ साली ४१.६ टक्के होते ते २००१ साली ३७.४ टक्के झाले. त्याचवेळी उत्तर प्रदेशातून होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण वाढले. १९६१ साली उत्तर प्रदेशातून मुंबईत १२ टक्के स्थलांतरीत येत होते तेच प्रमाण २००१ साली २४ टक्के झाले. स्थलांतर आणि शहर अभ्यास विभागाच्या राम बी भगत यांनी ही माहिती दिली. हे उत्तर भारतीय स्थलांतरीत असंघटित क्षेत्रात मोठया प्रमाणावर आहेत. इथे वेतनही कमी आणि कामाचीही हमी नसते.

दरम्यान, मराठी मातृभाषिकांची संख्या कमी झाली असली तरी आजही अन्य भाषिकांच्या तुलनेत मुंबईत मराठी मातृभाषिकांची संख्या जास्त आहे. २००१ साली मराठी मातृभाषा आहे सांगणाऱ्यांची संख्या ४५.२४ लाख होती. २०११ मध्ये हेच प्रमाण ४४.०४ लाख झाले. त्याच दशकभरात गुजराती भाषिकांची संख्या किंचित कमी झाली. २००१ साली १४.३४ लाख लोकांनी गुजराती मातृभाषा असल्याचे सांगितले होते. २०११ मध्ये हीच संख्या १४.२८ लाख होती.

२००१ साली ऊर्दू भाषिक १६.८७ लाख होते. २०११ मध्ये हे प्रमाण १४.५९ लाख झाले. फक्त हिंदी भाषिकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. २५.८२ लाखावरुन हिंदी मातृ भाषा आहे सांगणाऱ्यांची संख्या ३५.९८ लाख झाली. ३९.३५ टक्के ही वाढ आहे. कुटुंब विस्तार आणि मुंबईत वाढलेल्या जागांच्या किंमतीमुळे मूळ मराठी भाषिक मुंबईकर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात वास्तव्याला गेला. पण तिथेही हिंदी भाषिकांची संख्या झपाटयाने वाढली. ठाणे जिल्ह्यात हिंदी भाषिकांची संख्या ८०.४५ टक्के तर रायगड जिल्ह्यात ८७ टक्के आहे.

त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठी माणूस मनसेकडे एकवटल्यास नवल वाटायला नको. अन्यथा भविष्यात मराठी माणसाला कोणीही वाली नसेल हे वास्तव आहे. मराठी मतदार स्वतःची वृत्ती बदलण्यास तयारच नसेल तर भविष्यात मनसे आणि राज ठाकरे यांना देखील बदलत्या राजकीय परिस्थितीत स्वतःला बदलावे लागेल. त्यावेळी त्यांना देखील राजकीय पक्ष म्हणून दोष देण्यात अर्थ नसेल. नेहमी एकमेकांवर आणि स्वकीयांवर चिखलफ़ेक करून, स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानणाऱ्या मराठी माणसाचीच त्यात सर्वस्वी चूक असेल. त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर राज ठाकरे यांच्या मनसेसोबत एकवटल्यास नवल वाटायला नको.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x