18 November 2019 12:25 AM
अँप डाउनलोड

प्रभू श्रीराम म्हणतात, देश घातलात खड्यात आता माझ्या नावाने!

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सद्यस्थितीवर भाष्य करणारे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. त्यांनी आजच्या व्यंगचित्रातून अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावर शिवसेना, भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांवर बोचरी टीका केली आहे.

सध्या देशभरात अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा प्रचंड चर्चेत आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा आगामी निवडणुकीच्या तोंडावर २ दिवसांचा अयोध्या दौरा पूर्ण करून नुकतेच मुंबई मध्ये परतले आहेत. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “राम मंदिर बांधलं नाही तर ते भविष्यात बनले, परंतु हे पुन्हा सरकार बनणारनाही”, असा मोदी सरकारला इशारा त्यांनी दिला होता. तर, याच दौऱ्यादरम्यान विहिंप’ने राम मंदिराच्या निर्माणासाठी अयोध्येत भव्य धर्मसभेच आयोजन केलं होतं. त्यामुळेच केवळ आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या राजकीय स्टंट बाजीवरून राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात “जनतेने तुमच्याकडे रामराज्याची मागणी केली होती, राम मंदिराची नव्हे” असे भाष्य करताना स्वतः प्रभू श्रीराम दाखवले आहेत.

या व्यंगचित्रात दाखविल्याप्रमाणे, एका बाजूला प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण दाखवण्यात आले आहेत. तर त्यात दुसऱ्या बाजूला विहिंप, भाजपा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दाखवण्यात आले आहेत. त्यात उद्धव ठाकरे हे विहिंप तसेच भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध दिशेने राम मंदिराची मागणी करताना दाखविण्यात आले आहेत. तर प्रभू श्रीराम असे भाष्य करत आहेत की “अहो, देश घातलात खड्ड्यात आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात. अरे लोकांनी तुमच्याकडे रामराज्य मागितले होते, राम मंदिर नव्हे’ असं प्रभू श्रीराम बोलताना दाखवण्यात आले आहेत.

काय व्यंगचित्र आहे ते नेमकं?

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(472)#udhav Thakarey(398)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या