तीच झलक! अमित ठाकरेंचा सक्रिय राजकारणातील प्रवेश ठरू शकतो तरुणांसाठी आकर्षणाचा विषय
मुंबई : राज ठाकरेंचे चिरंजीव सक्रिय राजकारणात कधी येणार हा सर्वांसाठी चर्चेचा विषय होते आहे. अर्थात प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि राज ठाकरे अस संपूर्ण कुटुंबच एक विचारधारा असलेलं विद्यापीठ म्हणून महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला परिचित आहे. त्यामुळे असा वारसा लाभलेल्या कुटुंबातील तिसरी पिढी जेव्हा सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या कानावर पडू लागतात, तेव्हा त्याबद्दल कुतूहल निर्माण होणारच.
त्यांचे पिता राज ठाकरे हे उत्तम वक्ते आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याने कदाचित त्यांच्याकडून अधिक अपेक्षा असू शकतात. राज ठाकरेंची भाषण शैली आणि सभेतील विषयांची मुद्देसूद मांडणी नेहमीच प्रसार माध्यमांच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे. राज ठाकरेंचा राजकीय प्रवास हा खूप कमी वयात सुरु झाला होता. प्रत्यक्ष सक्रिय राजकारणात ते योग्य वेळी उतरले असले तरी कमी वयातच त्यांचा बाळासाहेबांसोबत प्रवास सुरु झाला होता. एकूणच बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राज ठाकरेंना कमी वयातच राजकीय शिक्षण मिळत होत आणि स्वर्गीय. बाळासाहेबांसोबतचा तो एक प्रवासच त्यांना राजकीय प्रगल्भता देऊन गेला असावा.
स्वर्गीय. बाळासाहेबांसोबतचा तो कमी वयात सुरु झालेला राजकीय प्रवास राज ठाकरेंना उत्तम ज्ञात असणार यात काहीच शंका नाही. त्यामुळे एखाद व्यक्तिमत्व जबरदस्तीने घडवता येत नाही, तर ते प्रत्यक्ष अभ्यासातून घडवावं लागत आणि ती एक प्रकिया असते, ज्यासाठी वेळ देणं ही गरज असते आणि तेच नेमकं राज ठाकरे अनेक वर्षांपासून करताना दिसत होते. अमित ठाकरे सुद्धा मागील काही वर्षांपासून राज ठाकरेंसोबत दिसत आले आहेत. मग तो एखादा राजकीय दौरा असेल, जाहीर सभा असेल किंवा पदाधिकारी वा कार्यकर्त्यांचा मेळावा, परंतु अमित ठाकरे आज पर्यंत कधीच व्यासपीठावर दिसले नाहीत. कारण ते त्याच निरीक्षणातून आणि अभ्यासातून जात आहेत, जसे राज ठाकरे हे बाळासाहेबांसोबत तशाच प्रवासातून राजकारणात आले होते.
अमित ठाकरेंनी सक्रिय राजकारणात कधी आणि केव्हा यावे हे राज ठाकरे यांच्या व्यतिरिक्त कोणीच उत्तम प्रकारे समजू शकत नाही हे वास्तव आहे. आपल्या मुलाच्या आवडीनिवडी, सवयी आणि त्यांना कशात अधिक रुची आहे हे आई-वडिलांव्यतिरिक्त कोणताही मनुष्य प्राणी अचूक ओळखू शकत नाही. त्यामुळे अमित ठाकरेंच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशा बाबतीत राज ठाकरेंसारख्या अभ्यासू आणि अनुभवी व्यक्तीला सल्ला देणे म्हणजे निव्वळ खोडसाळपणा म्हणता येईल. परंतु राज ठाकरे हे भिन्न राजकीय परिस्थितीत प्रगल्भ झालेल नैतृत्व आहेत आणि अमित ठाकरेंचा काळ हा आधुनिक राजकारणाचा झाला आहे, ज्यामध्ये आजच आधुनिक तंत्रज्ञान सुद्धा राजकारणात महत्वाची भूमिका बजावत आहे.
अर्थात अमित ठाकरे हे राज ठाकरेंकडून अनेक गोष्टी आत्मसात करत असतील, परंतु त्या गोष्टी आणि अनुभव आत्मसात करताना अमित ठाकरेंनी त्याला आधुनिकतेची जोड देणं ही काळाची गरज आहे. राजकारणाचा भविष्यकाळ हा आधुनिक मीडिया असेल आणि ते स्वीकारणं फायद्याचं ठरेल. अमित ठाकरे हे पारंपरिक राजकारणासोबतच मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्राच्या भविष्यासंबंधित अनेक गंभीर विषय नजरेसमोर ठेऊन ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तमाम महाराष्ट्रासोबत जोडले जाऊ शकतात, पण कसे त्याचा गंभीरपणे विचार करने गरजेचे आहे. स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधील एक कला किंवा आवड अमित ठाकरेंमध्ये सुद्धा आहे आणि ती म्हणजे ते सुद्धा व्यंगचित्रकार आहेत.
मुंबईतील नामांकित डीजी रुपारेल कॉलेजमधून ग्रॅज्युएशन सोबत त्यांनी आर्किटेक्चरच शिक्षण सुद्धा पूर्ण केलं आहे. त्यांच व्यक्तिमत्व हे तरुणांना आकर्षित करेल असच आहे. राज ठाकरेंच्या राजकीय प्रवासातील सुरवातीची राजकीय व सामाजिक परिस्थिती ही वेगळी होती. तर अमित ठाकरेंच्या सक्रिय राजकारणाच्या प्रवेशावेळची म्हणजे विद्यमान राजकीय व सामाजिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे या दोन व्यक्तिमत्वांचा स्वभाव आणि दृष्टिकोन कदाचित भिन्न असू शकतो आणि त्यात काही वावगं नाही. परंतु राज ठाकरे हे त्यांचे केवळ पिता नसून तर ते त्यांचे गुरु सुद्धा आहेत हे ध्यानात घेणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रनामा न्यूज’च्या टीमने अमित ठाकरेंच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाबद्दल जेव्हा अनेक युवकांशी संवाद साधला तेव्हा अनेकांनी हेच मत व्यक्त केलं की त्यांनी पारंपरिक पद्धतीने म्हणजे एखाद्या विद्यार्थी संघटनेच्या किंवा तरुणांच्या संघटनांचे अध्यक्षपद घेऊन राजकारणात प्रवेश करण चुकीचं नसलं तरी अजून काहीतरी वेगळ्याप्रकारे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्राशी जोडलं जाण गरजेचं आहे आणि तरच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतील असं मत व्यक्त केलं. पक्षाने कामगारांच्या हक्कासाठी ‘कामगार संघटना’ स्थापने यात काहीच वावगं नसून ते गरजेचं आहे, परंतु मराठी तरुणांसाठी आता ‘स्टार्टअप असोसिएशन्स’ होणे सुद्धा गरजेचे आहे, ज्यामुळे मराठी तरुण-तरुणींमधल्या उद्योजकाला सुद्धा भविष्यात वाव आणि संधी उपलब्ध करून देता येईल असं अनेक सुशिक्षित तरुणांना वाटत आहे.
त्यातील अनेक आयटी क्षेत्रातील तरुण-तरुणींनी असं सूचित केलं की, सध्याचे अनेक तरुण राजकारणी हे केवळ फेसबुक आणि व्हाट्सअँप’ला आधुनिक तंत्रज्ञान समजतात, पण मुळात हे केवळ संवादाचे दोन ‘प्लँटफॉर्म’ आहेत आणि आधुनिक तंत्रज्ञान हे त्या पलीकडचं आहे. त्यामुळे अमित ठाकरेंनी ते समजून घेतलं आणि शहरापासून ते ग्रामीण भागातील जनतेशी जोडले गेले तरच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतील असं प्रामाणिक मत व्यक्त केलं. त्यातील एका युवकाने हसत आणि मिश्कीलपणे प्रतिक्रिया दिली की,’कदाचित आम्ही अमित ठाकरेंकडून जास्त अपेक्षा करत आहोत, कारण ते राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत’. विशेष म्हणजे एका तरुणीने अमित ठाकरेंबद्दल बोलताना मत मांडल की,’ मला त्यांच्या भाषण शैलीत राज ठाकरेंना पाहायला खूप आवडेल’. त्यामुळे आम्हाला तरुणाईमध्ये अमित ठाकरेंच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाबद्दल कुतूहल आहे हे ध्यानात आलं.
अमित ठाकरे हे मनसेच्या पडत्या काळात पक्ष कार्यात अधिक सक्रिय झाले आहेत. त्यामुळे या परिस्थितीने त्यांना बरंच काही शिकवलं असणार आणि अशी परिस्थितीच प्रत्येक व्यक्तीला अधिक कणखर बनवते. त्यामुळे सध्या पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा अमित ठाकरेंच्या सक्रिय राजकीय प्रवेशाबद्दल आग्रह असला तरी राज ठाकरे हे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी दिली.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट