मुंबई : काँग्रेसने उद्या पुकारलेल्या भारत बंद पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि महागाईविरोधात प्रतिदास मिळतो काय अशी शंका उपस्थित होऊ लागली होती. परंतु त्यात आक्रमक मनसेने सुद्धा उडी घेतल्याने उद्या मोदी सरकारविरोधात सर्व रोष रस्त्यावर पाहायला मिळू शकतो. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांसोबत मनसे महिला आघाडी सुद्धा सक्रिय पणे रस्त्यावर उतरतील अशी शक्यता आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिकृत ट्विट करून तसेच पक्षातर्फे प्रसिद्धीपत्रक सार्वजनिक करून सामान्य लोकांना अनेक आवाहन सुद्धा करण्यात आली आहेत. इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी संलग्न असले तरी केंद्र तसेच राज्य सरकारने त्यावर अनेक कर लावले आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयाची फटका सामान्यांना सहन करावा लागत आहे. त्याचा निषेध म्हणून मनसे विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसेच बंद असल्याने गणेशोत्सवासाठी बाहेरगावी जाणाऱ्यांनी उद्या पाच वाजल्यानंतरच घराबाहेर पडण्याची विनंती मनसेने केली आहे.

तसेच उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरणार आहे. बंद दरम्यान सरकारी मालमत्तांची नासधूस होणार नाही आणि सामान्य लोकांना त्याची झळ बसणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी मनसे सैनिकांना केलं आहे. दरम्यान, नोकरवर्गाने कामावर जाऊ नये. गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांनी उद्या गाड्याबाहेर काढू नयेत, अशी विनंती सुद्धा करण्यात आली आहे.

काय म्हटलं आहे राज ठाकरे यांनी ट्विट’मध्ये तसेच प्रसिद्ध केलेल्या पत्रात?

MNS will participate in tomorrows bharat band against increasing petrol and diesel cost