7 May 2025 4:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

एक्जिट पोल मोदी सरकारच्या विरोधात गेल्याने शेअर बाजार कोसळला

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे एक्जिट पोल भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच मोदी सरकारच्या विरोधात गेल्यामुळे आज शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे मुंबय शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी बाजार उघडताच ४७८.५९ अंकाची मोठी घसरुन होऊन तो ३५,२०४.६६ वर सुरु झाला होता. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये सुद्धा तब्बल १८५ अंकाची घसरगुंडी झाल्याचे पहायला मिळाले. सकाळी बाजार उघडताच निफ्टीची १०,५०८.७० अंकावर सुरुवात झाली.

दरम्यान, आज सकाळी ९:३५ वाजता सेन्सेक्स ५७९ अंकानी घसरून ३५,०९३ वर तर निफ्टी १७७ अंकानि खाली घसरला आणि थेट १०,५१६ अंकावर खाली आला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या