6 July 2020 4:13 AM
अँप डाउनलोड

#बजेट-२०१९: ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर नाही

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प मांडला. त्यात शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय जनतेला दिलासा देण्याचा पूर्ण प्रयत्न त्यांनी केला. दरम्यान, आता ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आजच्या घोषणा;

 1. नवीन घर बनवण्याच्या योजनेत २०२० पर्यंत नोंदणी करणाऱ्याला आयकरातून सूट.
 2. साडे सहा लाखांपर्यंत प्रोव्हीडंट फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आयकर भरावा लागणार नाही.
 3. आयकरची मर्यादा २.५ टक्क्यांनी वाढवून ५ लाखांपर्यंत करण्यात आली आहे.
 4. पुढील दहा वर्षात १० ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचा सरकारचा मानस.
 5. घर बनवण्यास जीएसटीत सुट मिळावी यासाठी काऊंसील विचार करत आहे.
 6. २४ तासांच्या आत आयकर परतावा मिळणार.
 7. पुढील ५ वर्षामध्ये १ लाख गावांची निर्मिती.
 8. मागील ५ वर्षात मोबाईल डेटा वापरात ५० टक्क्यांची वाढ.
 9. मुद्रा योजने अंतर्गत १५ हजार २२३ कोटींच्या कर्जाचे वाटप.
 10. भटक्या व विमुक्त जमातींसाठी कल्याण विकास मंडळाची स्थापना करण्यात येणार.
 11. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ १५ हजार कमावणाऱ्या श्रमीकांना मिळेल.
 12. गरिबांना स्वस्त दराने अन्न मिळण्यासाठी १ लाख ७० हजार कोटी रुपये खर्च करणार.
 13. २ हेक्टर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी ६ रुपये सरळ खात्यात टाकले जातील.
 14. २२ प्रकारच्या कृषी मालाला ५० टक्के पर्यंत एमएसपी देण्यात येईल.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1239)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x