15 May 2021 2:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
x

आंदोलना दरम्यान परप्रांतीयांच्या हिंसक प्रकारामुळे नाव मराठा समाजाचं खराब होतंय: राज ठाकरे

नवी मुंबई : आज नवी मुंबईमध्ये महानगरपालिका कर्मचारी मेळावा पार पडला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी अनेक गंभीर मुद्यांना हात घातला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना राज ठाकरे यांनी परप्रांतीयांनी हिंसक घटना घडवून मराठा समाजाचं खराब करण्याचा प्रयत्नं केला असा गंभीर आरोप केला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

नवी मुंबईत तसेच ठाण्यात मराठा समाजाच्या आंदोलना दरम्यान अनेक हिंसक घटना घडल्या होत्या. परंतु पोलिसांनी केलेल्या अटक सत्रात अनेक अमराठी परप्रातीयांची नावं समोर आली होती. त्यावेळी हिंसक घटनांमुळे आंदोलकांवर प्रसार माध्यमांमधून सुद्धा टीका झाली होती. त्याचाच धागा पकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विषयातील गांभीर्य समोर मांडताना सांगितलं की, अनेक परप्रातीयांनी आंदोलनात घुसखोरी करत हिंसक प्रकार घडवून आणले आणि मराठा समाजाचं नाव खराब करण्याचा जाणीव पूर्वक प्रयत्नं केला.

पुढे बोलताना त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलं की, वास्तविक त्या परप्रांतीयांचा मराठा समाजाशी किंवा महाराष्ट्राशी काही संबंध नव्हता तरी त्यांनी मराठा समाजाच आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला हे पोलिसांनी केलेल्या अटक सत्रात सुद्धा समोर आले आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(664)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x