17 November 2019 9:50 PM
अँप डाउनलोड

पंकजा मुंडे बालिश असून त्यांना ती काय चिक्‍कीची फाईल वाटली का? : आंबेडकर

नंदुरबार : जर मराठा आरक्षणाची फाईल माझ्या टेबलवर आली असती तर क्षणाचा सुद्धा विलंब न लावता मी मराठा आरक्षणाच्या फाईलवर सही केली असती या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या विधानाचा सर्वच थरातून समाचार घेतला आहे. त्यात आता प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा निशाणा साधला आहे.

भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंचा समाचार घेताना म्हटलं आहे की, ते विधान निव्वळ बालिशपणाचे असून असा एका मिनिटात निर्णय आणि सही होत नाही. एका मिनिटात सही करायला ती काय चिक्कीची फाइल आहे काय, असा उपरोधिक टोलाही प्रकाश आंबेडकरांनी हाणला आहे.

त्यामुळे एकूणच ग्रामविकास मंत्री यांनी परळी येथील मराठा समाजाच्या आंदोलकांना संबोधित करताना जोश मध्ये वक्तव्य केलं खरं, परंतु त्यावर आता चोहोबाजींनी टीका होताना दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(76)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या