26 September 2020 7:58 PM
अँप डाउनलोड

लोकसभेत राहुल गांधींनी घेतली नरेंद्र मोदींची गळाभेट

नवी दिल्ली : आज केंद्रातील मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान लोकसभेत वेगळंच राजकीय नाट्य अनुभवायला मिळालं. कारण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत बोलताना मोदी सरकारवर तुफान आरोप आणि टीकेच्या फैरी झाडल्या. परंतु, दुसरीकडे ते नरेंद्र मोदी आणि भाजपबद्दल माझ्या मनात जराही द्वेष नसल्याचं सांगत त्यांनी लोकसभेत थेट पंतप्रधान नरेन्द्र मोदींची गळाभेट घेतली आणि एकच चर्चा रंगली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राहुल गांधींच लोकसभेत भाषण सुरु होण्याआधीच भाजप खासदारांनी त्यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खिल्ली उडविण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे राहुल गांधी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होत. काही वेळातच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं भाषण सुरु झालं आणि त्यांनी नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष आणि आरएसएस’ला लक्ष केलं. भाजप, आरएसएस आणि नरेंद्र मोदींच्या मनात माझ्याविषयी खूप राग आहे असं ते म्हणाले.

मी त्यांच्या दृष्टीने पप्पू आहे आणि माझ्याविषयी ते खूप अपप्रचार करतात. तरी माझ्या मनात तुमच्याबद्दल जराही द्वेष नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी थेट नरेंद्र मोदींच्या असणापर्यंत चालत गेले आणि मोदींना मिठी मारली. सुरवातीच्या दृश्यात मोदींच्या हावभावावरून मोदी या कृत्याने चिडल्याचे दिसत होते. परंतु काही क्षणात त्यांनी स्वतःला सावरत पुन्हा स्मित हास्य करत राहुल गांधींना प्रतिसाद दिला.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1318)#Rahul Gandhi(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x