19 October 2021 8:56 AM
अँप डाउनलोड

निवडणूक निकालाआधी रॉबर्ट वड्रा यांच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी

नवी दिल्ली : मागील चार वर्षांहून अधिक काळ संबंधित प्रकरणी तपास यंत्रणा काम करत होती. परंतु, सदर प्रकरणात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी रॉबर्ट वड्रा यांच्यावर कारवाईची फास आवळण्यात आल्याने वेगळीच शंका व्यक्त करण्यात येते आहे. यावेळी ते आम्हाला आत डांबून ठेवून बोगस पुरावे तयार करत असल्याचा खळबळजनक आरोप वाड्रा यांच्या वकिलांनी प्रसार माध्यमांकडे केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, अंबलबजावणी संचालनालयाने आज रॉबर्ट वड्रा यांच्या नवी दिल्लीतील कार्यालयांवर छापे घातले. वाड्रा यांच्या नवी दिल्लीतील तीन कार्यालयांवर ईडीने हे छापे टाकल्याचे वृत्त आहे. ईडीमधील अनेक अधिकारी वड्रा यांच्या कार्यालयात चौकशी करत असल्याची माहिती सार्वजनिक झाली होती.

आमच्या लोकांना ईडीने खोलीत डांबून ठेवले आहे. तसेच त्यांना भेटण्याची कोणाला सुद्धा सूट देण्यात आलेली नाही असे वाड्रा यांच्या वकिलांनी स्पष्ट केले. दरम्यान या धाडीचा थेट संबंध निवडणुकीच्या निकालाआधी काँग्रेसवर दबाव तंत्राचा भाग समजला जात आहे.

हॅशटॅग्स

#Congress(524)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x