14 December 2024 12:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC
x

बेस्ट संप: राऊतांना संगीत व संप यातला फरक कळतो का? 'बेस्ट'च्या संपावर संगीतमय 'चेष्टा'

मुंबई : मागील ५ दिवसांपासून बेस्टचा संप सुरु असून, त्यामुळे बेस्टचे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि सामान्य मुंबईकर असे सर्वच हैराण झाले असताना शिवसेनेचे आणि मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून संताप जनक प्रतिक्रिया आली आहे.

कारण, पाच दिवसांपासून सुरु असलेल्या संपा विषयी जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी जी प्रतिक्रिया दिली, त्याने सर्वच थरातून त्यांच्यावर टीकेचा भडीमार करण्यात येतो आहे. कारण ‘ठाकरे’ सिनेमाच्या म्युझिक लाँचवेळी पत्रकारांनी बेस्टच्या संपाबाबत त्यांना विचारले असता, या चित्रपटाचे संगीत ‘बेस्ट’ झाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, राऊत यांनी असे उत्तर दिले असता उपस्थितांमध्ये शिवसैनिकांमध्ये सुद्धा हशा पिकल्याचे पाहायला मिळाले. बेस्ट उपक्रमाच्या तब्बल २७ आगारांमध्ये कर्मचाऱ्यांनी ४ दिवसांपासून ठिय्या दिला आहे. त्यात बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांचे सुद्धा हाल झाले आहेत आणि प्रवासादरम्यान त्यांना अधिकचा पैसा सुद्धा खर्च करावा लागत आहे. अशा मध्ये शिवसेना मात्र या गंभीर विषयावर केवळ टोलवाटोलवी करणारी उत्तर देत आहे. विशेष म्हणजे कोर्टाने सरकारचे कान उपटल्यानंतरच राज्य सरकारकडून संपावर तोडगा काढण्यासाठी थोड्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x