18 November 2019 12:16 AM
अँप डाउनलोड

मुख्यमंत्र्यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस

नवी दिल्ली : निवडणूक प्रतिज्ञापत्रात २ खटल्यांची माहिती लपवल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. सतीश ऊके यांनी न्यायालयात फडणवीसांविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्यात आली. तसेच सदर प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा त्यांची बाजू मांडण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करताना मुख्यमंत्र्यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर असलेल्या २ फौजदारी खटल्यांची माहिती पूर्णपणे लपवली होती’, असे वकील सतीश ऊके यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे नियमानुसार उमेदवाराविषयी जाणून घेण्याचा मतदाराचा हक्क डावलण्यात आला आणि हे नियमांचे उलंघन असल्याने देवेंद्र फडणवीस यांची निवड रद्द करावी, अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. त्यावरच न्यायालयाने ही नोटीस बजावल्याचे समजते.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(337)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या